कोरोनाकाळात कागलचा युवक ठरतोय 'प्राणवायू'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 05:34 PM2021-04-19T17:34:07+5:302021-04-19T17:46:54+5:30

CoronaVirus Kolhapur- कागल तालुक्यातील आलाहाबादचा युवक मिलिंद बाबुराव चौगलेने  डॉ. आशिष पाटील यांच्या सहकार्याने निपाणी येथिल श्रीपेवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये आँक्सिजन निर्मितीचा प्लँट उभारला आहे. कोरोनाकाळात कागलचा हा युवक 'प्राणवायू' ठरत आहे.

Kagal's youth becomes 'oxygen' in Corona period | कोरोनाकाळात कागलचा युवक ठरतोय 'प्राणवायू'

कोरोनाकाळात कागलचा युवक ठरतोय 'प्राणवायू'

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रासह कर्नाटकात ऑक्सिजन पुरवठादररोज ५०० सिलेंडरची निर्मिती :२४ तास निर्मितीचे काम

दत्तात्रय पाटील

म्हाकवेः भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्येने हिमनगच गाठले आहे. हा रोग थेट माणसावरच मारा करत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना गंभीर परिस्थितीत आँक्सिजनची नितांत गरज असून कोरोनामुळे गेल्या वर्षापासून ऑक्सिजनचे (प्राणवायू) महत्त्व आणखी वाढले आहे. याचा विचार करून कागल तालुक्यातील आलाहाबादचा युवक मिलिंद बाबुराव चौगलेने  डॉ. आशिष पाटील यांच्या सहकार्याने निपाणी येथिल श्रीपेवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये आँक्सिजन निर्मितीचा प्लँट उभारला आहे. कोरोनाकाळात कागलचा हा प्लँट 'प्राणवायू' ठरत आहे.

हवेतील ऑक्सिजन शोषून तो सिलिंडरमध्ये भरला जात आहे. वाढती मागणी पाहता हे काम २४ तास सुरू असून दररोज आँक्सिजनचे ५०० सिलेंडर बाहेर पडत आहेत. ऑक्सीजन सिलेंडरचा निपाणी,बेळगावसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, नांदेड, वाशिम,सोलापूर,पुणे,मुंबई येथे पुरवठा केला जात आहे.

 कोरोना रुग्णांची गंभीर स्थिती आहे. कर्नाटकासह महाराष्ट्रात पैसे देऊनही ऑक्सिजन सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाकाळात कागलचा हा प्लँट सीमावासीयांना 'प्राणवायू' ठरत आहे. मिलिंद यांचे वडील पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त असून औषधविक्रेतेचा व्यवसाय असणाऱ्या मिलिंद आणि स्वतः आर्थोपेडिक सर्जन असणाऱ्या डॉ. आशिष यांनी सामाजिक दायित्व स्विकारत ना नफा...ना तोटा हे तत्त्व अंगीकारले आहे. त्यामुळे नैसर्गिक युद्धजन्य परिस्थितीच्या काळात हजारो गरजूंना ते मदतीचा हात देत आहेत. या प्रकल्पासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ,बेळगाव जिल्हा औद्योगिक वसाहतीचे अधिकारी दोड्ड बसवराज यांचे सहकार्य लाभले.

अशी होते प्रक्रिया...

हवेत साधारपणे १५ ते १८ टक्के ऑक्सिजन असतो. तो कंप्रेसरच्या माध्यमातून शोषूण घेतला जातो. त्यातील कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर काढला जातो. उर्वरित आँक्सिजनवरही प्रक्रिया केली जाते. फिल्टर यंत्रणेतून ऑक्सिजनचे विलगीकरण केले जाते. शुद्ध ऑक्सिजन शोषून तो सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णांना दिला जात आहे. कोटयावधी खर्चाच्या या प्लँटची उभारणीतही ना नफा.. ना तोटा तत्वाने  भविष्यातील ऑक्सिजनची गरज ओळखून आँक्सिजनच्या उपलब्धतेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.


"पुर्वी २०टक्के आँक्सिजन सिलेंडर ही रुग्णालयासाठी तर ८०टक्के औद्योगिक कंपन्यांसाठी वापरला जात. परंतु,सध्या कोरोनाची महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांसाठी आँक्सिजनची गरज वाढली आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार रुग्णांकडील आँक्सिजन पुरवठयात वाढ केली आहे. ही गरज लक्षात घेवून आँक्सिजन निर्मितीत वाढ करण्याचा प्रयत्न करु.
- मिलिंद चौगुले,
ऑक्सीजन प्लँटधारक, निपाणी


" उच्च तंत्रज्ञानाचा वापर हा ऑक्सिजन प्लॅटची उभारणी केली आहे.सध्या ऑक्सिजनची  गरज वाढत असून ती पूर्ण करण्यासाठी आपला हातभार लागत आहे याचे फार मोठे आत्मिक समाधान आहे.
- डॉ. आशिष पाटील,
आर्थोपेडीक सर्जन,निपाणी

Web Title: Kagal's youth becomes 'oxygen' in Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.