शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कागल ही राजर्षी शाहूंची नगरी, जनताच जातीयवादी प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल- हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 12:03 IST

राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणविणाऱ्या समरजित घाटगे यांनी अशा कृत्यामुळे त्यांना काय वाटत असेल. याचा विचार करावा. समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाड आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.

कागल : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीवरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. धार्मिक धावना दुखावल्याचे कारण देत यावरुन टीका-टीप्पणी सुरु झाल्या. यावरुन शाहू ग्रुपचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनीही मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. तर, आपण स्वत: यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही घाटगे यांनी सांगितले. यासर्व घडामोडीनंतर मंत्री मुश्रीफ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.माझ्या वाढदिवसाला कार्यकर्ते जाहीराती देतात. वाढदिवसाच्या दिवशी मी हजर नसतो. त्यामुळे समरजित घाटगे माझ्या विरोधात तक्रार दाखल करून फक्त स्टंट करीत आहेत. माझ्या वाढदिवसाला लोक दहा वीस पाने जाहीरात देतात या बद्दल यांच्या पोटात दुखत आहे. कागल ही राजर्षी शाहूची नगरी आहे. अशा जातीयवादी प्रवृत्तीला कागलची जनता योग्य जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागल येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाडयावेळी मुश्रीफ म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यानी संयम ठेवावा. त्यांना सामाजिक ऐक्य बिघडावयाचे आहे. आपण ते जपणार आहोत. राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणविणाऱ्या समरजित घाटगे यांनी अशा कृत्यामुळे त्यांना काय वाटत असेल. याचा विचार करावा. समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाड आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. आपण वडाचे झाड आहोत. हे त्यांनी लक्षात घ्यावे. असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.दरम्यान कागल शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गैबी चौकात मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यांना घरी शांततेत जाण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. नवीद मुश्रीफ, चद्रंकात गवळी, प्रकाश गाडेकर, प्रविण काळबर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ