कोल्हापूर : सदरबाजारमधील पंचशील भवन, बुद्ध विहार येथील कबड्डी मैदानावर मंथन फाउंडेशनने कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. मुलांच्या ५५ किलो गटात आणि मुलींच्या ५० किलो गटात होणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातून संघ सहभागी झाले.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याहस्ते झाले. यावेळी मारुती माने, नगरसेविका स्मिता माने, कबड्डी प्रशिक्षक संभाजी पाटील, रमेश भेंडीगिरी, राजेंद्र बनसोडे, पैलवान माऊली जमदाडे प्रमुख उपस्थित होते. आपल्या प्रभागातील मुला-मुलींचे क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी स्मिता माने यांच्यामार्फत या मैदानाची निर्मिती केली. नियमितपणे सर्व खेळाडूंचे प्रशिक्षण मोफत सुरू आहे. माने त्यांच्या नेतृत्वाखाली सदरबाजार प्रभागाचा विकास झाला असल्याचे माजी खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, खेळाडू उपस्थित होते.
दरम्यान, या स्पर्धेतील प्रत्येक सामना रंगतदार झाला. अंतिम सामना रविवारी (दि. ७) झाला. त्यातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
फोटो (१००२२०२१-कोल-मारूती माने न्यूज फोटो) : कोल्हापुरात शनिवारी सदरबाजारमध्ये मंथन फाउंडेशनतर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याहस्ते झाले. यावेळी शेजारी माऊली जमदाडे, माररुती माने, स्मिता माने आदी उपस्थित होते.