शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ज्योत्स्ना चराटी आजऱ्याच्या पहिल्या नगराध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:09 IST

आजरा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत ताराराणी आघाडी पक्ष पुरस्कृत आजरा शहर विकास आघाडीचे प्रमुख अशोक चराटी यांच्या आघाडीने नगराध्यक्षपदासह १० जागा मिळवून सत्ता मिळविली.नगराध्यक्षपदाच्या शहर विकास आघाडीच्या उमेदवार ज्योत्स्ना अशोक चराटी यांनी तब्बल ४,५६५ मते मिळवून विरोधी राष्ट्रवादीच्या अलका जयवंत शिंपी यांच्यावर १,५०६ मतांच्या फरकाने ...

आजरा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत ताराराणी आघाडी पक्ष पुरस्कृत आजरा शहर विकास आघाडीचे प्रमुख अशोक चराटी यांच्या आघाडीने नगराध्यक्षपदासह १० जागा मिळवून सत्ता मिळविली.नगराध्यक्षपदाच्या शहर विकास आघाडीच्या उमेदवार ज्योत्स्ना अशोक चराटी यांनी तब्बल ४,५६५ मते मिळवून विरोधी राष्ट्रवादीच्या अलका जयवंत शिंपी यांच्यावर १,५०६ मतांच्या फरकाने विजय मिळविला. शिंपी यांना ३,०५९ मते, तर परिवर्तन आघाडीच्या स्मिता जनार्दन टोपले यांना २,४६८ मते मिळाली.नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, काँगे्रसचे आमदार सतेज पाटील, जि. प. सदस्य जयवंत शिंपी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राष्ट्रवादी-काँगे्रस-सेना युतीला ६ जागा, तर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर व माजी सरपंच जनार्दन टोपले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. १९ अपक्ष उमेदवारांपैकी शकुंतला लक्ष्मण सलामवाडे या एकमेव अपक्ष महिलेने बाजी मारून पहिल्याच सभागृहात जाण्याचा पराक्रम केला.तिरंगी निवडणूक आणि शहर विकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीच्या प्रचारासाठी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार मुश्रीफ, आमदार पाटील, के . पी. पाटील, तर परिवर्तनच्या प्रचारासाठी आमदार आबिटकर यांच्या प्रचार सभामुळे निवडणुकीत मोठी चुरस झाली होती.येथील शासकीय प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी दहा वाजता निवडणूक अधिकारी तथा भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व गडहिंग्लजच्या मुख्याधिकारी सुषमा शिंदे-कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी झाली.१ ते ९ प्रभागांचा निकाल अवघ्या अर्ध्या तासात, तर १० ते १७ या प्रभागांसह नगराध्यक्षपदाचा निकाल ११.३० च्या सुमारास बाहेर आला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.शहर विकास आघाडीच्या विजयासाठी चराटी यांच्यासह डॉ. अनिल देशपांडे, विजयकुमार पाटील, रमेश कुरूणकर यांनी, काँगे्रस-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या विजयासाठी शिंपी यांच्यासह मुकुंद देसाई, विष्णुपंत केसरकर यांनी, तर परिवर्तन आघाडीच्या विजयासाठी टोपले यांच्यासह प्रा. अर्जुन आबिटकर, आदमसाब माणगावकर व सहकाºयांनी विशेष परिश्रम घेतले.चराटींनाच फायदाआजरा शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीला परिवर्तन आघाडीने आव्हान दिले होते. अपक्षांचा भरणा आणि तिरंगी सामन्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. मात्र, तिरंगी लढतीचा फायदा चराटी यांनाच झाला.विद्यमान दोन सदस्य विजयी, चार पराभूतग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अशोक चराटी व संजीवनी सावंत हे दोघे या निवडणुकीत विजयी झाले, तर विजय थोरवत, संजय इंगळे, नयन भुसारी, मैमुनबी अब्दुलरशीद पठाण हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पराभूत झाले. (सविस्तर निकाल/विश्लेषण - हॅलो ५ वर)‘संभाजीं’ना साथ नशिबाचीबहुचर्चित प्रभाग २ मध्ये एकूण १० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी शिवसेनेचे संभाजी पाटील व शहर विकास आघाडीचे नाथा देसाई यांना समान २४० मते मिळाली. त्यामुळे तेथील निकाल चिठ्ठीद्वारे देण्यात आला. प्रज्वल पुरुषोत्तम ढेळके या शाळकरी मुलाने काढलेल्या चिठ्ठीत संभाजी पाटील नशीबवान ठरले.बाप-लेक सभागृहातशहर विकास आघाडीचे प्रमुख अशोक चराटी हे प्रभाग ११ मधून, तर त्यांची कन्या ज्योत्स्ना चराटी या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्यामुळे चराटी बाप-लेकीचा एकाचवेळी सभागृहात प्रवेश झाला आहे.