शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा यात्रेचे वेध -एसटीच्या १७५ बसेस धावणार-सेवा-सुविधेसाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:39 IST

कोल्हापूर : देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेचे वेध भाविकांना लागले आहेत. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ म्हणत महाराष्ट्र, कर्नाटकमधून आलेल्या

ठळक मुद्दे स्वयंसेवी संस्थां-प्रशासनाची तयारी पूर्ण

कोल्हापूर : देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेचे वेध भाविकांना लागले आहेत. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ म्हणत महाराष्ट्र, कर्नाटकमधून आलेल्या भाविकांच्या बैलगाड्या, त्यांना सुविधा पुरविण्यासाठी संस्थांची चाललेली लगबग, परिवहन महामंडळासह ग्रामपंचायत, जिल्हा-पोलीस प्रशासनाची सुरू असलेली तयारी अशी घाई सर्वत्र दिसत आहे.

चैत्रात होणारी यात्रा जोतिबा देवस्थानची सर्वांत मोठी यात्रा असते. यासाठी देशभरातील विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित असतात. यंदा ही यात्रा शनिवारी (दि. ३१) होत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध स्वयंसेवी संस्थांनी भाविकांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी नियोजन केले आहे. भाविकांसाठी पुजाºयांकडून रुग्णवाहिकेची सुविधा

जोतिबा : जोतिबा भाविकांसाठी स्थानिक पुजाºयांनी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात्रेसाठी येणाºया भाविकांना रुग्ण सेवा मिळावी या हेतूने जोतिबा स्थानिक पुजाºयांनी मंदिराजवळ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिलीआहे. गर्दीच्या वेळी भाविकांना रुग्ण सेवा तत्काळ मिळावी या उद्देशानेही रुग्णवाहिका मंदिराशेजारी उपलब्ध करून दिली आहे. नाथ सेवा ग्रुप या रुग्णवाहिकेचे व्यवस्थापन करणार आहे. सामाजिक बांधीलकीतून ही रुग्णसेवा पुजाºयांच्या वतीने दिल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आपत्कालीन सेवेसाठी अग्निशामक यंत्र, वायरलेस यंत्रणेसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.‘परिवहन’तर्फे जादा बसेस..यात्रा काळात डोंगरावर राज्य परिवहन महामंडळाच्या १७५ बसेस धावणार असून, भाविकांसाठी जादा बसफेºयांचीही सुविधा असणार आहे. यात्रेनंतर पुढे पाच रविवारी होणाºया पाकाळणी यात्रेसाठीही जादा बसफेºयांचे नियोजन आहे. कोल्हापूर विभागातील सर्व आगारांच्या बसस्थानकांतून जोतिबा डोंगर अशी थेट बससेवा भाविकांना मिळणार आहे. तसेच पंचगंगा नदीघाट येथे तात्पुरते यात्रा शेड उभारण्याची तयारी सुरू आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसस्थानकावर क्यू रेलिंगची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. दर पाच मिनिटाला बसफेरी ठेवण्यात येणार आहे. तरी एस. टी. बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.बैलगाड्यांची परंपरा कायम..पूर्वी वाहनांनी सोय नसल्याने भाविक बैलगाडीतून दिवसेंदिवस प्रवास करून यात्रेला जायचे. आता अनेक प्रकारची वाहने दिमतीला असली तरी अजूनही या यात्रेला बैलगाड्यांनी जाण्याची परंपरा दिसून येते. सासनकाठ्या घेऊन अशा हजारो बैलगाड्या डोंगरावर येतात. त्याआधी त्यांचा मुक्काम कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर असतो.नदीघाट स्वच्छताशाहू मॅरेथॉन, शाहू जीवन विकास ट्रस्ट व पंचगंगा घाट संवर्धन समिती व महापालिका यांच्यावतीने यात्रेनिमित्त आज, मंगळवारी पंचगंगा नदीघाटाची स्वच्छता करण्यात येणार आहे तसेच येथे यात्रेकरूंसाठी तात्पुरती स्नानगृहे तयार करण्यात येणार आहेत.पंचगंगा घाटावर शुक्रवारपासून अन्नछत्रशिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेकरूंसाठी पंचगंगा नदीघाटावर मोफत अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे. यंदा शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस हे अन्नछत्र सुरू राहील. यात्रेकरूंसाठी कुर्मापुरी, कांदाभजी, जिलेबी, शिरा, मसालेभात असा मेनू असून जवळपास १ लाख यात्रेकरूंना याचा लाभ घेता येईल. अन्नछत्रासाठी नदीघाटावर चार हजार चौरस फुटांचा मंडप घालण्यात येत आहे. गणेश कॅटरर्सच्यावतीने जेवण बनविण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार