जोतिबा : दख्खनचा राजा जोतिबाचा प्रकट दिन सोहळा गुरुवारी झाला. यानिमित्त जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती. प्रकटदिनानिमित्त जोतिबा मंदिरामध्ये पहाटे चार वाजता दंडस्नान, दीपोत्सव झाला. पहाटे पाच वाजता गणपती, घंटा पूजन, ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ६ .३० ला केदारनाथ प्रकट दिन सोहळा झाला. यावेळी सुंठवडा वाटप करून आतषबाजी केली. अकरा वाजता उंट, घोडा वाजंत्री देवसेवकांच्या लवाजम्यासह मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा पार पडला. सकाळी ७ ते ९ या दरम्यान अष्टभैरव लघुरुद्र अभिषेक करून जोतिबा देवाची उत्सव महापूजा बांधण्यात आली. जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. सकाळी ९ ते १२ केदार विश्वशांती यज्ञाचा विधी पार पडला. दुपारी १२ .३० वाजता श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते पूर्णाहुती दिली. यावेळी गुरुदेव अमर झुगर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. विश्वास झुगर, सचिन ठाकरे, उमेश शिंगे यांनी आजच्या यज्ञाचे पुरोहित केले. दुपारी १ वाजता शोभा यात्रा निघाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
Kolhapur: जोतिबा प्रकटदिन सोहळा विविध उपक्रमांनी उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:15 IST