शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

ज्योती मांढरे माफीचा साक्षीदार होण्यास तयार

By admin | Updated: February 5, 2017 01:16 IST

वाई हत्याकांड सुनावणी; सर्व हकिकत सांगण्याचे केले कबूल

सातारा : ‘मी केलेले पाप आणि संतोष पोळ याने केलेले गुन्हे मी सांगायला तयार आहे. रात्रभर मला झोप येत नाही, त्यावेळी जे काही घडलं ते सगळं माझ्या चेहऱ्यासमोर येतं, मला पश्चात्ताप होतोय म्हणून मी खरीखुरी हकिकत न्यायालयात सांगायला तयार आहे,’ असे सांगून ज्योती मांढरे हिने आपण माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याची कबुली न्यायालयात दिली आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी प्रथमच जिल्हा न्यायालयात उपस्थित राहून सरकार पक्षाची बाजू मांडली. वाई येथील संतोष पोळ याने २००३ ते २०१६ या १३ वर्षांच्या कालावधीत सहा खून करून मृतदेह पुरल्याचा छडा सातारा पोलिसांनी लावला. या घटनेने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाल्यानंतर संतोष पोळ व साथीदार ज्योती मांढरे या दोघांना पोलिसांनी अटक केली. वाई पोलिसांनी या घटनेचा तपास करून येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सकाळी साडेअकरा वाजता अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाची न्यायालयात बाजू मांडली. त्यानंतर ज्योती मांढरेला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलविले. यावेळी न्यायमूर्तींनी ‘तू माफीचा अर्ज दिला आहेस का? तूला माफी कबूल आहे का?,’ असे विचारले. त्यावर ज्योती मांढरे म्हणाली, ‘मी केलेले पाप आणि संतोषने केलेले गुन्हे मी न्यायालयात सांगायला तयार आहे.’ ‘तू हे सगळं का सांगणार,’ असे न्यायाधीक्षांनी विचारल्यानंतर ज्योतीने ‘मला रात्रभर झोप येत नाही, सगळं माझ्या चेहऱ्यापुढं दिसतं म्हणून मी खरीखुरी हकिकत न्यायालयात सांगायला तयार आहे,’ असे सांगितले.दरम्यान, वाई हत्याकांड प्रकरणातील ६ पैकी ३ खुनांमध्ये ज्योतीचा समावेश असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयात सांगितले. हा सर्व खटला परिस्थितीजन्य असल्याने ज्योती मांढरे हिला न्यायालयाने माफीचा साक्षीदार करावे. पोळ हा मुख्य आरोपी असल्याने या दोघांची भेट झाली, तर तो ज्योतीवर दबाव आणण्याची शक्यता लक्षात घेता या दोघांना कारागृह प्रशासनाने भेटू दिले जाऊ नये, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला. ज्योतीने बाजू मांडल्यानंतर तिला न्यायालयातून कारागृहात नेण्यात आले. यावेळी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी या खटल्याच्या अनुषंगाने यापूर्वी घडलेल्या विविध घटनांचे दाखले दिले. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. श्रीकांत हुटगीकर यांनीही यावेळी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाल्यानंतर पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी याबाबतची पुढील सुनावणी दि. १३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)या हत्याकांडात संतोष पोळ हा मुख्य आरोपी आहे. त्यामुळे माफीच्या साक्षीदाराविषयी हरकत घ्यायचा त्याला कायदेशीर अधिकार नाही. ज्योती मांढरेला जर माफी दिली आणि तिने सर्व हकिकत न्यायालयात सांगितली, तर तिची माफी कायम राहील. न्यायालयाने माफी दिली तर या दोघांना परस्परांशी बोलण्याची परवानगी देण्यात येऊ नये. - अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील