शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन दिवसांवर ईद, खरेदीसाठी ओघ वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 14:01 IST

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘रमजान ईद’मुळे शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गर्दीने गजबजल्या होत्या; तर शबे कद्र (बडी रात) २७ व्या दिवशी  इफ्तारी सात वाजून पाच मिनिटांनी संपली. हा रोजा मुस्लिम बांधवांसह अन्यधर्मीयांनी मोठ्या उत्साहात केला.

ठळक मुद्देअवघ्या दोन दिवसांवर, ईद खरेदीसाठी ओघ वाढलादुकानांमध्ये सेल, खरेदीसाठी मोठी गर्दी

कोल्हापूर : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘रमजान ईद’मुळे शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गर्दीने गजबजल्या होत्या; तर शबे कद्र (बडी रात) २७ व्या दिवशी  इफ्तारी सात वाजून पाच मिनिटांनी संपली. हा रोजा मुस्लिम बांधवांसह अन्यधर्मीयांनी मोठ्या उत्साहात केला.यानिमित्त बाबूजमाल दर्गा परिसरात हिंदू-मुस्लिम महिलांनी महत्त्वाचा मानला जाणारा सत्ताविसावा रोजा सोडण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी अनेक हिंदू व मुस्लिम व्यक्ती, संघटनांकडून केळी, उपवास सोडण्याचे पदार्थ वाटण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी हा उपवास सोडण्यात आला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. यासह बडी मस्जिद व शहरातील अन्य मस्जिदच्या बाहेरील बाजूस महिलांनीही उपवास सोडला.दिवसभराच्या उकाड्यामुळे मुस्लिम बांधवांनी रविवारी सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडणे पसंत केले. रात्री शिवाजी चौक, हत्तीमहाल रोड, शिवाजी रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, बडी मस्जिद, राजारामपुरी, शाहूपुरी, आदी ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात कपडे, सुका मेवा खरेदीला प्राधान्य देण्यात आले. खास ईदसाठी काही दुकानांमध्ये सेल लागल्याने या ठिकाणीही खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.

कपड्यांच्या खरेदीबरोबर शिरकुर्मा अर्थात खिरीची साहित्यखरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. यात काजू , चारोळी, खारीक, बदाम, वेलदोडे, केशर, अक्रोड, मगज बी, नियमित हातांवर वळलेल्या शेवया, मिरज येथील भाजक्या शेवया यांना अधिक मागणी होती. यासोबतच सुगंधी अत्तरेही बाजारात आली आहेत. त्यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. 

 

टॅग्स :Ramadanरमजानkolhapurकोल्हापूर