शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दडीने चिंता वाढली: दिवसभर एक थेंबही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 17:33 IST

ढगांच्या गर्दीतच गुरुवारची सकाळ उगवली. वाटले आज धो धो पाऊस बरसेल, पण दिवस मावळला तरी पावसाचा एक थेंबही पडला नाही. दिवसभर नुसतीच ढगांची गर्दी राहिली, पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आभाळाकडे डोळे लावत होरपळणाऱ्या पिकाकडे पाहणेच बळीराजाच्या नशिबी आले.

ठळक मुद्देनुसतीच ढगांची गर्दी, पावसाची हुलकावणीपावसाच्या दडीने चिंता वाढली: दिवसभर एक थेंबही नाही

कोल्हापूर: ढगांच्या गर्दीतच गुरुवारची सकाळ उगवली. वाटले आज धो धो पाऊस बरसेल, पण दिवस मावळला तरी पावसाचा एक थेंबही पडला नाही. दिवसभर नुसतीच ढगांची गर्दी राहिली, पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आभाळाकडे डोळे लावत होरपळणाऱ्या पिकाकडे पाहणेच बळीराजाच्या नशिबी आले.जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाने दडी मारली आहे, संपूर्ण जून महिना पाऊस पडल्याने पावसाची ही उसंत बरी वाटली, पण त्यानंतर मात्र तरणा नक्षत्र संपून गेल्या रविवार पासून म्हातारा पाऊस सुरू झाला तरी पावसाची दडी कायम आहे. तरणा नक्षत्र संपता संपता चार दिवस सलग झालेला पाऊस एवढाच काय तो दिलासा. त्यानंतर गेले आठ दहा दिवस पाऊस गायबच आहे.म्हातारा पाऊस हमखास पडतो म्हणून पेरण्या, रोपलागण पूर्ण केली गेली.आता पिके वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली आहेत.

गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार गगनबावडा 3, शाहूवाडी 2, शिरोळ 1 आणि आजरा व हातकणंगले येथे अर्धा मिलिमीटर असा केवळ 7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही पाऊस निरंक आहे.गुरुवारी दिवसभर सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते, पण एक थेंबही पडला नाही, हवेत मात्र सकाळ पासूनच कमालीचा उष्मा जाणवत होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर