शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जरा पोरीचं त्वॉँड बघू द्या...

By admin | Updated: May 22, 2016 01:03 IST

दुर्दैवी मातेने केली आर्त विनवणी

आदित्य वेल्हाळ ल्ल कोल्हापूरपाठोपाठ पोरी झाल्या म्हणून नुकत्याच जन्मलेल्या ‘नकुशी’ला भावाच्या दारात सोडून देताना आईच्या काळजाची घालमेल झाली असली तरी शनिवारी सी. पी आर.च्या नवजात शिशुदक्षता विभागात त्या दुर्दैवी मातेने ‘मला जरासं पोरीचं त्वॉँड तरी बघू द्या की हो...’ म्हणून केलेली आर्त विनवणी मात्र महिला बालकल्याण समितीच्या कार्यकर्त्या व महिला पोलीस यांच्या हृदयाला पीळ पाडून गेली नाही. नऊ महिने पोटात वाढविल्यानंतर मातृत्वाच्या वेणा सोसून जन्म दिलेल्या पोटच्या गोळ्याला केवळ लोकलाजेस्तव या मातेने सोडून देण्याचा निर्णय घेतला खरा; पण अखेर आईचे मन तिला स्वस्थ बसू देत नव्हते. ‘सीपीआर’मध्ये तिच्या जिवाची ही तगमग तिच्या डोळ्यांत स्पष्टपणे दिसत होती. एक क्षणभर चिमुकलीला पाहावे असे वाटणाऱ्या त्या मातेच्या डोळ्यांत असंख्य भावनांचे जणू काहूरच उठले होते. शनिवारी दुपारी दीड वाजल्यापासून ही माता ‘सीपीआर’च्या नवजात शिशू विभागाच्या दारात भिंतीला पाठ टेकून बसली होती. कुणीतरी तिला सांगितले होते की, तुझे बाळ तुला आता परत देतील. या आशेवर ती बाळाला घेण्यासाठी ठाण मांडून बसली होती. तिच्याभोवती असलेल्या ‘महिला बालकल्याण’च्या चार कार्यकर्त्या आणि दोन महिला पोलिस कॉन्स्टेबल यांनी तिला घेरावच घातला होता. ‘तुझं बाळ टाकून देताना तुला काहीच वाटलं नाही का? असली कसली आई तू?’ अशा प्रश्नांबरोबरच तिची माहितीही विचारली जात होती. या सर्व प्रश्नांच्या माऱ्याला तोंड देताना तिची नजर मात्र आपलं बाळ असलेल्या खोलीच्या दरवाजाकडेच लागलेली होती. कुठल्याही क्षणी डॉक्टर येतील आणि आपल्याला बाळ बघायला बोलावतील अशी असोशी तिच्या डोळ्यांत एकवटली होती. कायद्यानुसार, वैद्यकीय तपासणीनंतरच तीच बाळाची आई आहे की नाही, याची खातरजमा झाल्याशिवाय बाळाला आईच्या ताब्यात देता येत नाही. तिला पाहायला नवजात शिशू विभागातील बालकांच्या नातेवाईक स्त्रिया जाळीच्या दरवाजात जमा झाल्या होत्या. ‘बाळ टाकून दिलेली आई’ म्हणून तिच्याकडे बघून कुजबुजत होत्या. ही कुजबुज तिच्या कानांवर जात होती; पण त्याकडे दुर्लक्ष करून ती बाळ पाहण्याची आस लावून बसली होती. ‘काय हे ताई, एवढ्या इवल्याशा बाळाला सोडून देताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही?’ असं विचारल्यावर शून्यात बघत ती म्हणाली, ‘बाळाला फक्त पिशवीत ठेवलं नव्हतं हो, दुपट्यात नीट गुंडाळून ठेवलं होतं. एकदा वाटलं, दरवाजावर थाप मारून भावाच्या प्रत्यक्ष हातात बाळाला द्यावं; पण ते धाडस झालं नाही हो...’ एवढं बोलून ती थांबली; पण एका हरलेल्या ‘आई’चे, हसीना सय्यदचे डोळे मात्र बाळाच्या आठवणींनी व्याकुळ झाले होते....