शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

जांभळीची गाय ‘गोकुळ श्री’

By admin | Updated: September 12, 2015 00:52 IST

दोन गटांत स्पर्धा : रेंदाळच्या राजेंद्र कोल्हापुरेंची म्हैस प्रथम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने घेण्यात आलेल्या जास्तीत जास्त दूध देणारी म्हैस व गाय स्पर्धेत जांभळी (ता. शिरोळ) येथील मंगलमूर्ती दूध संस्थेच्या प्राची अभय पाटील यांच्या गायीने, तर रेंदाळ येथील शेतकरी दूध संस्थेचे राजेंद्र चंद्रकांत कोल्हापुरे यांच्या म्हशीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना संघाच्या शुक्रवारी (दि. १८) होणाऱ्या सभेत सन्मानित करण्यात येणार आहे. ‘गोकुळ’ गेल्या २५ वर्षांपासून या स्पर्धा घेते. जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविण्याबरोबर दुग्ध व्यवसायाला बळकटी देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. जातिवंत गाय व म्हैस, मादी वासरू संगोपन योजना संघाने सुरू केली आहे. या योजनेतून आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक जातिवंत वासरांची नोंद झाली असून, १५ कोटी रुपये अनुदान दूध उत्पादकांना मिळालेले आहे. ‘गोकुळ श्री’ स्पर्धा गाय व म्हैस गटात घेण्यात आली. म्हैस गटात राजेंद्र कोल्हापुरे यांच्या म्हशीने प्रथम, गुडाळच्या पुष्पा पाटील यांच्या म्हशीने द्वितीय, तर लिंगनूरच्या काशिनाथ घुगरे यांच्या म्हशीने तृतीय क्रमांक पटकाविला. गाय गटात जांभळीच्या प्राची पाटील यांच्या गायीने प्रथम, मुरगूडच्या ज्ञानदेव गोधडे यांच्या गायीने द्वितीय, तर सांगलीच्या सतीश चौगले यांच्या गायीने तृतीय क्रमांक पटकाविला. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, या स्पर्र्धेमुळे दूध उत्पादनवाढीबरोबर गुणवत्ता सुधारण्यास चांगली मदत झाली आहे. (प्रतिनिधी) विजेत्यांची नावे व बक्षिसे  म्हैस गट संस्थेचे नावगावस्पर्धकाचे नावएक दिवसाचे दूध क्रमांकबक्षीसशेतकरीरेंदाळ, हातकणंगलेराजेंद्र चंद्रकांत कोल्हापुरे१६.७०५प्रथम२० हजार लक्ष्मीनारायणगुडाळ, राधानगरीपुष्पा दत्तात्रय पाटील१६.६६०द्वितीय१५ हजार कामधेनूलिंगनूर, गडहिंग्लजकाशीनाथ मारुती घुगरे१६.४५०तृतीय१० हजार गाय गट मंगलमूर्ती महिलाजांभळी, शिरोळप्राची अभय पाटील ३६.८९५प्रथम२० हजार दत्तमुरगूड, कागलज्ञानदेव गोपाळ गोधडे ३४.४००द्वितीय१५ हजार मोहनराव शिंदेसांगलीसतीश प्रकाश चौगले ३४.३८०तृतीय१० हजार