शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

जोतिबा देवाची आज चैत्र यात्रा

By admin | Updated: April 3, 2015 01:03 IST

डोंगरावर सासनकाठ्या दाखल : लाखो भाविक गुलालात रंगले; स्वयंसेवी संस्था, जिल्हा पोलीस प्रशासन, परिवहन महामंडळ सज्ज

जोतिबा/कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटकसह विविध प्रांतांतील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज, शुक्रवारी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशीच डोंगरावर सासनकाठ्यांसह लाखो भाविक गुलालाल रंगले; तर सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, जिल्हा पोलीस प्रशासन, परिवहन महामंडळ या सर्वांनी स्वत:ला भाविकांच्या सेवेत झोकून दिले आहे. आज यात्रेचा मुख्य सोहळा होणार असून, पहाटे ५ ते ६ या वेळेत शासकीय अभिषेक होईल. दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत सासनकाठ्यांची मिरवणूक होईल. सायंकाळी ५.३० वाजता ‘श्रीं’ची पालखी श्री यमाई मंदिराकडे निघेल. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत येथेच थांबून पालखी आठ वाजता पुन्हा मंदिराकडे परत येईल. त्यानंतर रात्री १० वाजता ‘श्रीं’ची आरती, धुपारती होईल. यात्रेनिमित्त यादिवशी देवालय रात्रभर दर्शनासाठी खुले राहील, अशी माहिती देवस्थानच्यावतीने देण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीचे उद्घाटन होणार आहे. शासकीय महाभिषेक सोहळा पन्हाळ्याचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या हस्ते होईल. चैत्र पालखी सोहळ्यास शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील, पाटणचे आमदार शंभूराजे देसाई उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश भागांतून लाखोंच्या संख्येने जोतिबा डोंगरावर भाविक दाखल झाले आहेत. ‘चांगभलं’च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून गेला आहे. जोतिबा डोंगर घाटातून येणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. पायवाटेने भाविक जोतिबाचा डोंगर चढत आहेत. यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठ्यांसह भाविक मोठे ट्रक, ट्रॉल्यांतून, अगदी पायीसुद्धा कोल्हापुरात दाखल होत आहेत. मध्यवर्ती बसस्थानक, दसरा चौकातून जोतिबासाठी जादा एस.टी. बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, पंचगंगा घाटावर भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. गाड्यांचा ताफाच उपलब्ध करून देण्यात आला आहे.डोंंगरावर बसस्थानकाजवळ आर. के. मेहता ट्रस्टतर्फे मोफत अन्नछत्र सुरू आहे. शॉवरची सोय...--परगावहून आलेले भाविक पंचगंगा नदीघाटावर स्नान करून जोतिबासाठी रवाना होतात. भाविकांना नदीपात्रात उतरावे लागू नये व त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा घाटावर पंचगंगा घाट संवर्धन कृती समिती व ‘फिनोलेक्स’च्यावतीने महिलांना अंघोळीसाठी व कपडे बदलण्यासाठी शेड उभारण्यात आले आहे. येथे कृत्रिम शॉवरची सोय करण्यात आले आहेत. भाविकांसाठी मोफत झुणका- भाकर --श्री महालक्ष्मी भक्त मंडळ-धर्मशाळेतर्फे चैत्री पौर्णिमेस जोतिबाची यात्रा करून परतणाऱ्या भक्तांसाठी श्री अंबाबाई मंदिरामध्ये ‘श्रीरामाचा पार’ या ठिकाणी शनिवारी ४ एप्रिल रोजी मोफत झुणका-भाकर वाटपाचा उपक्रम होत आहे. हा उपक्रमाचा प्रारंभ उपजिल्हा पोलीसप्रमुख (मुख्यालय)चे किसन गवळी यांच्या हस्ते होणार आहे. ‘रोटरी सनराईज’तर्फे आरोग्य शिबिर --रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सनराईजतर्फे जोतिबा येथे भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ प्रांतपाल गणेश भट यांच्या हस्ते झाला. यावेळी सहायक प्रांतपाल नील पंडित, देवेंद्र इंगळे, अध्यक्ष प्रसन्ना देशिंगकर, सचिव राहुल कुलकर्णी, शंतनू बसरूर, रणजित माळवे, श्रीकांत मोरे, सचिन झवर, राजीव परीख, रवी संघवी, दीपक लोहिया, मकरंद मुल्हेरकर, प्रशांत खोडबोले, श्रीकांत झेंडे, दिनेश वसा उपस्थित होते. या शिबिरासाठी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन व पंत वालावलकर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले आहे. सासनकाठी मिरवणुकीचे आकर्षणचैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठ्या म्हणजे मुक्तीचे ज्वलंत प्रतीक मानले जाते. युद्धात कामी आलेल्या राक्षस पत्नींनी श्री केदारलिंगांकडे मुक्तीचे साकडे घातले. ते याच दिवशी केदारलिंगांनी पूर्ण केले. आजही मोठ्या भक्तिभावाने या सासनकाठ्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी एक वाजता निघणार आहे. यामध्ये अनुक्रमे निनाम पाडळी (सातारा), विटे (पाटण), कसबे डिग्रज (मिरज), मौजे निगवे (करवीर), कसबा सांगाव (कागल), किवळ (कऱ्हाड), श्रीमंत छत्रपती महाराज (ता. करवीर), कोडोली (पन्हाळा), मनपाडळे (हातकणंगले), फाळकेवाडी (वाळवा), दरवेश पाडळी (हातकणंगले) या सासनकाठ्यांचा समावेश होणार आहे. सासनकाठी मिरवणुकीचे आकर्षणचैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठ्या म्हणजे मुक्तीचे ज्वलंत प्रतीक मानले जाते. युद्धात कामी आलेल्या राक्षस पत्नींनी श्री केदारलिंगांकडे मुक्तीचे साकडे घातले. ते याच दिवशी केदारलिंगांनी पूर्ण केले. आजही मोठ्या भक्तिभावाने या सासनकाठ्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी एक वाजता निघणार आहे. यामध्ये अनुक्रमे निनाम पाडळी (सातारा), विटे (पाटण), कसबे डिग्रज (मिरज), मौजे निगवे (करवीर), कसबा सांगाव (कागल), किवळ (कऱ्हाड), श्रीमंत छत्रपती महाराज (ता. करवीर), कोडोली (पन्हाळा), मनपाडळे (हातकणंगले), फाळकेवाडी (वाळवा), दरवेश पाडळी (हातकणंगले) या सासनकाठ्यांचा समावेश होणार आहे. वाहनांसाठी मोबाईल व्हॅनडोंगराकडे जाणाऱ्या केर्ली फाट्यावर छत्रपती संभाजीराजे फौंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा थ्री व्हीलर अ‍ॅटो रिक्षा मॅकेनिकल असोसिएशनने गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवसांसाठी मोफत सर्व्हिसिंग व दुरूस्तीची सेवा केंद्र सुरू केले. वाटेत नादुरूस्त व पंक्चर होणाऱ्या वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आली आहे.कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मॅकेनिकल असोसिएशनर्फे घाटात आठ ठिकाणी मोफत वाहन दुरुस्ती केंद्र शुक्रवारी दिवसभर ठेवण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ६० मॅकेनिकल तैनात आहेत. याशिवाय मोबाईलवर कॉल आल्यास जाग्यावर जावून सेवा देण्यासाठी मोबाईल दुचाकी आहेत. मोफत सेवा देण्याचे असोसिएशनचे दहा वर्ष आहे.सासनकाठी मिरवणुकीचे आकर्षणचैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठ्या म्हणजे मुक्तीचे ज्वलंत प्रतीक मानले जाते. युद्धात कामी आलेल्या राक्षस पत्नींनी श्री केदारलिंगांकडे मुक्तीचे साकडे घातले. ते याच दिवशी केदारलिंगांनी पूर्ण केले. आजही मोठ्या भक्तिभावाने या सासनकाठ्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी एक वाजता निघणार आहे. यामध्ये अनुक्रमे निनाम पाडळी (सातारा), विटे (पाटण), कसबे डिग्रज (मिरज), मौजे निगवे (करवीर), कसबा सांगाव (कागल), किवळ (कऱ्हाड), श्रीमंत छत्रपती महाराज (ता. करवीर), कोडोली (पन्हाळा), मनपाडळे (हातकणंगले), फाळकेवाडी (वाळवा), दरवेश पाडळी (हातकणंगले) या सासनकाठ्यांचा समावेश होणार आहे. वाहनांसाठी मोबाईल व्हॅनडोंगराकडे जाणाऱ्या केर्ली फाट्यावर छत्रपती संभाजीराजे फौंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा थ्री व्हीलर अ‍ॅटो रिक्षा मॅकेनिकल असोसिएशनने गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवसांसाठी मोफत सर्व्हिसिंग व दुरूस्तीची सेवा केंद्र सुरू केले. वाटेत नादुरूस्त व पंक्चर होणाऱ्या वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आली आहे.कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मॅकेनिकल असोसिएशनर्फे घाटात आठ ठिकाणी मोफत वाहन दुरुस्ती केंद्र शुक्रवारी दिवसभर ठेवण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ६० मॅकेनिकल तैनात आहेत. याशिवाय मोबाईलवर कॉल आल्यास जाग्यावर जावून सेवा देण्यासाठी मोबाईल दुचाकी आहेत. मोफत सेवा देण्याचे असोसिएशनचे दहा वर्ष आहे.