शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टोप संभापुरातील चार स्टोन क्रशर सील, तहसीलदारांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:50 IST

प्रदूषण नियंत्रणच्या नियमांचे उल्लंघन व बिगरशेतीचा परवाना नसल्याने टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील निकिता स्टोन क्रशर, श्रीराम स्टोन क्रशर, विजय स्टोन क्रशर, सुपरटेक रेडीमिक्स प्लांट रविवारी दुपारी जिल्हा खनिकर्म विभाग व हातकणंगले तहसीलदार कार्यालयाने धडक कारवाई करीत सील केले.

ठळक मुद्देटोप संभापुरातील चार स्टोन क्रशर सीलखनिकर्म विभाग, हातकणंगले तहसीलदारांची संयुक्त कारवाई

कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रणच्या नियमांचे उल्लंघन व बिगरशेतीचा परवाना नसल्याने टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील निकिता स्टोन क्रशर, श्रीराम स्टोन क्रशर, विजय स्टोन क्रशर, सुपरटेक रेडीमिक्स प्लांट रविवारी दुपारी जिल्हा खनिकर्म विभाग व हातकणंगले तहसीलदार कार्यालयाने धडक कारवाई करीत सील केले.टोप संभापूर परिसरातील स्टोन क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसह अन्य नागरिकांना त्रास होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा खनिकर्म कार्यालय, इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालय, हातकणंगले तहसीलदार कार्यालयाकडे तक्रारी दाखल होत्या.

त्या पार्श्वभूमीवर संबंधित स्टोन क्रशरचालकांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते; परंतु त्यांच्याकडून कोणताही समाधानकारक खुलासा देण्यात आला नाही. उलट या स्टोन क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात भरच पडत गेली. तसेच या स्टोन क्रशर चालकांकडे बिगरशेतीचेही परवाने नाहीत. तरीही बेकायदेशीररीत्या व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंंघन करीत क्रशर सुरूच ठेवले आहेत.त्यामुळे जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, हातकणंगलेचे तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावचे मंडल अधिकारी गणेश बरगे यांच्या पथकाने रविवारी दुपारी टोप संभापूर येथील या चार क्रशरवर धडक कारवाई करीत ते सील केले. याबाबतचे आदेश संबंधित क्रशरवर चिकटविण्यात आले.कायदा माझे काय बिघडवितो? या आवेशात स्टोन क्रशर चालकांनी सर्वच नियमांची पायमल्ली केली आहे. दररोज उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांसह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या धुळीमुळे पार्किंग केलेल्या दुचाकींसह चारचाकी वाहनांवर थरच्या थर साचून त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन खनिकर्म विभाग व हातकणंगले तहसीलदार कार्यालयाने संयुक्तरीत्या केलेल्या या धडक कारवाईचे स्वागत होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर