शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जीवन पाटील, नंदकुमार पाटील, फराकटेंचा राष्टÑवादीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 18:58 IST

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माघारीच्या शेवटच्या क्षणी मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. राष्टÑवादीचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, अशोक फराकटे, कागल पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार पाटील व शामराव भोई यांनी राष्टÑवादी-भाजप आघाडीला धक्का देत विरोधी पॅनेलमधून उमेदवारी घेतल्याने राधानगरी, भुदरगड व कागलमधील समीकरणे बदलणार आहेत.

ठळक मुद्देशेवटच्या क्षणी विरोधी पॅनेलमधून उमेदवारी राजकीय उलथापालथीने समीकरणे बदलणारदेसार्इं, जमादारांचा पत्ता कट!कौलगेत वातावरण तणावपूर्ण

कोल्हापूर ,28 : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माघारीच्या शेवटच्या क्षणी मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. राष्टÑवादीचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, अशोक फराकटे, कागल पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार पाटील व शामराव भोई यांनी राष्टÑवादी-भाजप आघाडीला धक्का देत विरोधी पॅनेलमधून उमेदवारी घेतल्याने राधानगरी, भुदरगड व कागलमधील समीकरणे बदलणार आहेत.

माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत दोन्ही पॅनेलची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. राष्टÑवादी-भाजप आघाडीचे इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक आचार्य विद्यानंद सांस्कृतिक हॉल येथे; तर विरोधी शिवसेनेचे समर्थक नष्टे हॉल येथे थांबून होते. बºयाच नावांचा काथ्याकूट करीत राष्टÑवादी-भाजपच्या ‘महालक्ष्मी शेतकरी विकास’ पॅनेलमधील उमेदवारांची घोषणा दुपारी साडेबारा वाजता राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केली.

विरोधकांची नजर राष्टÑवादी-भाजपच्या पॅनेलकडे होती. कोणाकोणाला संधी मिळाली याची माहिती घेत नाराजांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी यंत्रणा लावली होती. त्यानुसार जीवन पाटील, अशोक फराकटे, शामराव भोई, नंदकुमार पाटील यांना आपल्याकडे वळविण्यात प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, दिनकरराव जाधव यांना यश आले.

शिवसेनेचे नेते मंडलिक यांच्या रुईकर कॉलनी येथील घरातून सूत्रे हलवीत होते. दुपारी अडीच वाजता त्यांनी ‘राजर्षी शाहू पॅनेल’ची घोषणा केली. यामध्ये राष्टÑवादीला सोडचिठ्ठी देऊन आलेले जीवन पाटील यांना संस्था गटातून, अशोक फराकटे यांना गट क्रमांक २ मधून, तर नंदकुमार पाटील यांना गट क्रमांक ३ मधून संधी देण्यात आली. ‘महालक्ष्मी’ पॅनेलमध्ये के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, धनाजीराव देसाई व श्रीपती पाटील यांना; तर ‘राजर्षी शाहू’ पॅनेलमध्ये विजयसिंह मोरे या विद्यमान संचालकांना संधी मिळाली.

देसार्इं, जमादारांचा पत्ता कट!राष्टÑवादीच्या पॅनेलमध्ये गट क्रमांक पाचमधून शेखर देसाई (गारगोटी) यांचे नाव निश्चित झाले होते; पण शेवटच्या क्षणी मधुकर देसाई (म्हसवे) यांना संधी देण्यात आली; तर विरोधी पॅनेलमध्ये संस्था गटातून राजेखान जमादार यांना थांबवून जीवन पाटील यांची ऐनवेळी घोषणा केली.

कौलगेत फिरकायचं नायराष्टÑवादीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर डावललेले इच्छुक चांगलेच संतप्त झाले होते. कौलगे (ता. कागल) येथील चंद्रशेखर सावंत यांनी ‘आता कौलगेत तुम्ही फिरकायचं नाय!’ अशा शब्दांत उपस्थित नेत्यांना तंबी दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.नेत्यांच्या नावाचा उद्धार!दोन्ही पॅनेलची घोषणा होताच उमेदवारी न मिळालेल्यांनी आपला संताप व्यक्त करताना नेत्यांच्या नावांचा चांगलाच उद्धार केला. ‘पै-पाहुण्यांसाठी किती दिवस माघार घेत राहायचे?’ अशा बोलक्या प्रतिक्रियेसह तिखट शब्दांत नेत्यांचा समाचार घेतला.

इच्छुकांचे पाय धरा

राष्टÑवादी-भाजपकडे इच्छुकांचा भरणा होता; त्यामुळे प्रत्येकाची समजूत काढताना पॅनेलप्रमुख के. पी. पाटील यांची दमछाक उडाली होती. ‘ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्या घरी जाऊन नुसते हात जोडू नका; तर त्यांचे पाय धरा,’ अशी सूचना ते उमेदवारांना करीत होते.

धक्कातंत्राची परंपरा कायम‘बिद्री’च्या निवडणुकीची दिशा शेवटच्या क्षणीच ठरते, हा आजपर्यंत इतिहास आहे. त्यानुसार याही वेळेला शेवटच्या टप्प्यात मोठ्या घडामोडी घडल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.