शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जयसिंगपूर होणार ‘ग्रीन सिटी’

By admin | Updated: July 23, 2014 23:21 IST

नगरपालिका : चार हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

संदीप बावचे -जयसिंगपूरशतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जयसिंगपूरला ग्रीन सिटी बनविण्याचे ध्येय नगरपालिकेचे आहे. शहरात वृक्षलागवड आणि संगोपन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील वृक्षारोपणाच्या या पर्यावरणपूरक चळवळीत सामाजिक संस्थांचा सहभाग अजूनही दिसलेला नाही. शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जयसिंगपूर नगरपालिकेला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून वृक्षलागवडीची मोहीम व्यापकपणे पालिका राबवत आहे. शहरात चार हजार झाडे लावली जाणार असून, वृक्षारोपणासाठी खड्डे काढण्यात येणार आहेत. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहरातील सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, विविध संघटना, शिक्षण संस्था अशा अनेक घटकांना आवाहन केले जाणार आहे. जयसिंगपूर शहराला ग्रीन सिटी बनविण्याच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपणासाठी रोपे लावून नागरिकांनी योगदान देण्याची गरज आहे.गतवर्षी अडीच हजार झाडे लावण्यात आली होती. पालिकेने केलेल्या आवाहनानुसार विविध सामाजिक संस्थांनी रोपे दिली होती. शाळा, महाविद्यालय परिसरात रोपे लावण्यात आली. यावर्षी चार हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट असून, वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. पालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरात २० हजारांहून अधिक झाडे आहेत. सर्वच प्रभागांत वृक्षलागवड केली जाणार आहे. ग्रीन सिटीच्या दृष्टिकोनातून हौसिंग सोसायटी, गृहनिर्माण संस्था, आदी ठिकाणी झाडे लावण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.वृक्षलागवड करत असताना पालिकेने नियोजन केले आहे. यामध्ये धार्मिक कारणासाठी आवश्यक असणारी रोपे, सावली देणारी, शहराचे सौंदर्य वाढविणारी रोपे, सुगंधी फुलांची रोपे, पक्षी मोठ्या प्रमाणात आकर्षित होणारी रोपे, आरोग्याच्या दृष्टीने आॅक्सिजन निर्मिती करणारी रोपे आणि डास प्रतिबंधात्मक रोपे शहरामध्ये लावली जाणार आहेत. वृक्षलागवडीसाठी नागरिकांना प्रेरित करण्यात येणार आहे. गतवर्षी लावण्यात आलेली झाडे अत्यंत चांगल्या पद्धतीने संगोपित झाली. याही वर्षी पालिकेने शहराला ग्रीन सिटी बनविण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले आहे. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. सामाजिक भावनेतून सर्वांनीच वृक्षलागवड व संगोपन करणे गरजेचे आहे.- सुनीता खामकर, नगराध्यक्षा जयसिंगपूर