शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘जयप्रभा’प्रश्नी हेरिटेज कमिटीने कोल्हापूरचे हित पाहिले नाही : स्थायी सभेत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 12:25 IST

जयप्रभा स्टुडिओची जागा विभाजन करण्याबाबतचे पडसाद बुधवारच्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. भूपाल शेटे यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. ‘जयप्रभा’ प्रकरणी आयुक्त कार्यालयाकडून नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. रामसिन्हा कन्स्ट्रक्शनकडून ही जागा विकसित करणे सुरू आहे.

ठळक मुद्देजागा विभाजन प्रस्ताव महासभेसमोर आणण्याच्या सूचना

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओेची जागा वाचविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. हेरिटेज कमिटीने निर्णय घेताना महापालिका अगर कोल्हापूरचे हित पाहिले नसल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. या जागेच्या बदल्यात विकासकाला पर्यायी जागा अथवा टीडीआर का देण्यात आलेला नाही? हा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी महासभेसमोर आणावा, अशी मागणी बुधवारी स्थायी समितीच्या सभेत अनेक सदस्यांनी केली. अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख हे होते.

जयप्रभा स्टुडिओची जागा विभाजन करण्याबाबतचे पडसाद बुधवारच्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. भूपाल शेटे यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. ‘जयप्रभा’ प्रकरणी आयुक्त कार्यालयाकडून नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. रामसिन्हा कन्स्ट्रक्शनकडून ही जागा विकसित करणे सुरू आहे. ही स्टुडिओची जागा आरक्षित राहण्यासाठी यापूर्वी अनेक आंदोलने झाली. जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी विकासकाला २१ कोटी रुपये द्यावे लागण्याचा अभिप्राय नगररचना विभागाकडून दिला आहे; पण पैशाऐवजी त्यांना ‘टीडीआर’ देण्याबाबत वटमुखत्यारदाराशी प्रशासनाने कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही.

यापूर्वी टीडीआर अथवा पर्यायी जागा देण्याबाबत महासभेत मंजुरी दिलेली आहे; पण त्याची कार्यवाही ठेवली नसल्याबाबत शेटे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हेरिटेज कमिटीने दि. २५ जानेवारी २०१८ रोजी दिलेली मंजुरी चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले, कमिटीने निर्णय घेताना कोल्हापूरचे व महानगरपालिकेचे हित पाहिले नसल्याचाही आरोप केला. हा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी महासभेसमोर आणावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ‘जयप्रभा’च्या जागेबाबत अद्याप निर्णय घेतलेला नसून २१ कोटी रुपये देणे, पर्यायी जागा अथवा टीडीआर देणे याबाबत धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव तयार केल्याचा प्रशासनाने खुलासा केला.

यावेळी राजारामपुरी-शास्त्रीनगर पाण्याच्या टाकीवरील पाणीपुरवठ्याचे नियोजन, शहरातील एलईडी बल्ब, स्पॉट बिलिंग काम नवीन २५ मशीनद्वारे वेगाने होणार, खानविलकर पेट्रोल पंपासमोरील रस्ता डांबरीकरण, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.महापालिकेची बनावट पावतीहॉटेल वेस्टेज गोळा करताना आठ ते १० हजारांची पावती ही बनावट दिली जाते; तसेच रुग्णालयाकडील वेस्टेज उचलणाऱ्या गाडीवर संगनमताने प्लास्टिक परस्पर बाहेर विकले जात असल्याचाही आरोप आरोप नियाज खान यांनी केला. अवनि संस्थेमार्फत हॉटेलचा कचरा गोळा केला जातो. त्यांच्याकडील पावत्या तपासून घेऊ, असे उत्तर प्रशासनाने दिले.-------------सेंट्रल किचनकडून दर्जेदार जेवण नसल्याची तक्रारशाळेतील मुलांना सेंट्रल किचनकडून दर्जेदार जेवण मिळत नसल्याची तक्रार सविता भालकर यांनी केली. मुलांच्या जेवणात पैसे खाऊ नका. जेवणाबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा नियाज खान यांनी दिला. प्रत्येक शाळेत दोन सदस्य आठवड्यातून एकदा शाळेत जाऊन जेवणाची तपासणी करतील. जेवण दर्जेदार नसल्यास करवाई करू, असाही इशारा सभापती देशमुख यांनी दिला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका