शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जयंती नाल्याचे पाणी झाले प्रवाहित, दुसऱ्या टप्प्यातील सफाई मोहीम यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:30 IST

कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी महानगरपालिकेने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मोहीम ...

ठळक मुद्दे जयंती नाल्याचे पाणी झाले प्रवाहित, दुसऱ्या टप्प्यातील सफाई मोहीम यशस्वीमहिलांनी दिला ‘स्वच्छ, सुंदर कोल्हापूर’चा नारा; स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी महानगरपालिकेने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मोहीम राबविली. मोहिमेमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक रहिवाशांनी मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला.

दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेतून नाल्यातील सुमारे १४ डंपर कचरा काढून तो उठाव केला. बचत गटांच्या महिलांनी ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’ असा नारा देत जनजागृती रॅली काढली. ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते सिद्धार्थनगर या दरम्यान कोल्हापूर शहरातून जाणारा हा जयंती नाला स्वच्छ करून पाणी प्रवाहित केले.महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियोजित केल्याप्रमाणे कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला लोकसहभागातून सफाईच्या मोहिमेला गेल्या रविवारी (दि. ५) प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर रविवारी दुसºया टप्प्यात नाला सफाईला प्रारंभ झाला.उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक राजाराम गायकवाड, संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, न्यायाधीश उपेशचंद्र मोरे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, फेरीवाला संघटनेचे दिलीप पोवार यांनी सक्रिय सहभाग नोदवला.पंप हाऊस ते सिद्धार्थनगरपर्यंत, साईक्स एक्स्टेन्शनमधील जयप्रकाश नारायण उद्यान, यल्लमा मंदिरनजीक असे तीन ग्रुप करून ही स्वच्छता मोहीम राबविली. शहर पाणीपुरवठा व ड्रेनेज, बोअरिंग, बाग विभाग, आरोग्य विभाग, एन.यु.एल.एम., महिला बचत गट, स्थानिक नागरिक सहभागी झाले.

सर्वांनी जयंती तसेच इतर नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, नागरिकांनी कचरा कोंडाळ्यातच किंवा घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे देऊन सहकार्य करावे. नागरिकांनी आपल्या घरातील कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्ररीत्या गोळा करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावा, असे महापालिकेच्या वतीने आवाहन यावेळी करण्यात आले.

पावसाळ्यात थर्मोकॉल व प्लास्टिक नाल्यामध्ये साचून नाला तुंबतो. त्यामुळे थर्मोकॉल व प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करावी, लोकांमध्ये प्रबोधन करावे, दंडात्मक कारवाई करावी. संपूर्ण नालापात्रातील गाळ जेसीबी, पोकलँडचा वापर करून काढण्यात येणार असून, नाला पात्र रुंदीकरण करण्यात येणार आहे.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोमनपा.

बचत गटांच्या रॅलीने उपक्रमाची सांगताउपक्रमाची सांगता आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या उपस्थितीत बचत गटांच्या महिलांनी ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’अशा घोषणा देत रॅलीद्वारे केली. यावेळी महिलांनी जनजागृती मोहीम हाती घेतली. या बचत गटांमध्ये वारणानगर वारणा प्रेरणा सी.एम.आर. के. गट, माळीम महिला विकास बचत गट, आसावरी महिला बचत गट, जिद्द वस्तीस्तर संस्था, प्रगती वस्तीस्तर संस्था, शाहूपुरी येथील स्वरा फौंडेशन यांचा सहभाग होता.

स्वयंसेवी संस्थांचा सहभागया नाला सफाई मोहिमेला लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यामध्ये फेरीवाला संघटना, क्रिडाई कोल्हापूर, आर्किटेक्ट असोसिएशन, हॉटेल मालक संघ, राजाराम गायकवाड विचारमंच यांच्यासह अनेक महिला बचत गटांचा सहभाग होता. महापालिकेच्या आरोग्य, बागा, पवडी, घरफाळा, अग्निशमन, पाणीपुरवठा, ड्रेनेज, प्रकल्प, वर्कशॉपमधील सुमारे १००० अधिकारी, कर्मचारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते, नागरिक यांनी सहभाग नोंदविला.

यंत्रणाकर्मचारी, स्वयंसेवक : सुमारे १५००डंपर संख्या : ८जेसीबी संख्या : ४कचरा उठाव : १४ डंपर

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान