शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘चौकीदारां’च्या नशिबी जगण्याचा संघर्ष! किमान वेतनापासूनही वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 05:59 IST

सोशल मीडियावर ‘चौकीदारा’ने धुमाकूळ घातला आहे. विविध शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या सुमारे दहा लाख खऱ्या चौकीदारांचा (सुरक्षारक्षक) मात्र जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे.

- संतोष मिठारीकोल्हापूर - सोशल मीडियावर ‘चौकीदारा’ने धुमाकूळ घातला आहे. विविध शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या सुमारे दहा लाख खऱ्या चौकीदारांचा (सुरक्षारक्षक) मात्र जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. किमान वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील सुरक्षारक्षकांचा गेल्या नऊ वर्षांपासून लढा सुरू आहे.काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्दावरून ‘चौकीदार चोर है..’ अशी टिप्पणी केली. त्यास प्रत्युतर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या मंत्र्यांनी टिष्ट्वटर हँडलच्या नावाआधी ‘चौकीदार’ शब्द लावला आहे. या पार्श्वभूमीवर खºया चौकीदारांचे जगणे ‘लोकमत’ने जाणून घेतले.महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमध्ये सध्या सुमारे १० लाख सुरक्षा रक्षक कंत्राटी तत्त्वावर काम करतात. त्यापैकी अडीच लाख जण हे राज्य सुरक्षारक्षक महासंघ, जिल्हानिहाय मंडळे, कामगार युनियन काही राजकीय पक्षाच्या संघटनांकडे नोंदणीकृत आहेत. नोंदणीकृत असलेल्यांना दरमहा १२,५०० ते १३,५०० पर्यंत वेतन मिळते. त्यापैकी पीएफ., सानुग्रह अनुदान, ईएसआयसी, गणवेश आदींसाठी ४५ टक्के वेतन कपात होऊन त्यांच्या हातात प्रत्यक्षात सात-आठ हजार रुपये पडतात.किमान १७,५०० वेतन मिळावे मिळावे. वेळोेवेळी आस्थापनांवरील फायदे मिळावेत, आदी प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचा लढा सुरू आहे.आंदोलनानंतरच गणवेश, रेनकोट मिळालासुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नऊ आंदोलने केल्यानंतर गणवेश, स्वेटर्स, बूट, रेनकोट मिळाले. शासनाकडून वेतनवाढीचा प्रस्ताव मंत्रालयापर्यंत गेला असल्याचे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे उपाध्यक्ष अभिजित केकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, त्यांच्यासह कोणत्याही राजकीय नेत्याने आमची ओळख असलेल्या ‘चौकीदार’शब्दावरून राजकारण करू नये.आम्ही जिथे काम करतो तिथे सुरक्षा रक्षकाचेच काम करतो. त्यामुळे राजकारणासाठी कुणीही आमची टिंगलटवाळी करू नये.- प्रमोद बागडी, सुरक्षा रक्षक, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर