प्राईड ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे राज्य फूल आज शेणगाव फये या दरम्यानच्या जंगलाच्या मुख्य रस्त्यालाच आढळल्याने निसर्गप्रेमीच्यातून समाधान व्यक्त होत आहे. निसर्गमित्र दत्ता मोरसे, सुभाष माने व इंद्रजीत मराठे यांना हे फूल आढळले.
बुधवार (ता. २१) जंगल भ्रमंती करत असताना हे अनुपम सौंदर्य लाभलेले राज्यफूल या घनदाट जंगलाच्या परिसरात आढळल्याचे निसर्गमित्रांनी सांगितले.
दत्ता मोरसे म्हणाले, हे महाराष्ट्राचे राज्य फूल भुदरगडच्या पश्चिम घाटमाथ्याच्या पाटगाव रांगणा आदी परिसरात आजवर हे फूल आढळले नव्हते ते या शेणगांव-फयेच्या जंगल परिसरात आढळल्याने विकसित जंगलाची परिपूर्णता माझ्या लक्षात आली आहे. या फुलांमुळे आपण भारावून गेलो.
या फुलास जारूळ अथवा बोंडारा असेही म्हणतात. बहुतांश लोकांना आपल्या महाराष्ट्राचे हे राज्य फूल माहिती नाही. जांभळ्या रंगाची ही फुले लक्षवेधी आहेत.
फोटो : ओळ
शेणगाव-फये : जंगल रस्त्यावर आढळलेले जारूळ राज्य फूल.