शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘जनधन’ गतिमान

By admin | Updated: September 3, 2015 23:59 IST

एम. जी. कुलकर्णी : जिल्ह्यात साडेतीन लाख बँक खाती

कोल्हापूर : प्रधानमंत्री जनधन योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ५८ हजार ७४१ कुटुंबांची बँक खाती काढण्यात आली आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील दोन लाख ६० हजार, २५४ तर शहरी भागातील ९८ हजार ४८७ खात्यांचा समावेश आहे. यातील तीन लाख ३१८ धारकांना रूपे कार्डचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक एम. जी. कुलकर्र्णी यांनी गुरुवारी येथे बोलताना दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आहे. त्यासाठी बँक खाते उघडण्याची मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते काढण्यासाठी ही मोहीम गतिमान केली असून, प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत सर्वाधिक म्हणजे ७८ हजार ६५८ इतकी खाती बँक आॅफ इंडियात आहेत. यामध्ये ग्रामीण ६१ हजार २८७ व शहरी १७३७१ खात्यांचा समावेश आहे. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्र्ती सहकारी बँकेत ५७ हजार २०९ (५३ हजार ६०५), (३ हजार ६०४) अशा खात्यांचा समावेश आहे. इतर बॅँकांतही खाती उघडण्यात आली आहेत.कुलकर्णी म्हणाले, प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत शून्य बॅलन्सवर बँक खाते काढले जात असून, एक लाखाच्या अपघाती विम्याचे या योजनेत संरक्षण दिले आहे. त्याचा कसलाही हप्ता खातेदारास भरावा लागणार नाही. खातेदारास बँक पुस्तकाबरोबरच रूपे डेबिट कार्डर्ही दिले जात आहे. मात्र, हे कार्ड ४५ दिवसांतून विमा संरक्षण मिळण्याकरिता एकदा आर्थिक अथवा गैरआर्थिक कामासाठी वापरणे गरजेचे आहे. तसेच व्यवस्थित खाते व्यवहार करणाऱ्या खातेदारांना कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त पाच हजारांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट कर्ज सुविधेचा अंतर्भाव आहे. उघडलेली बँक खाती ही शासनाच्या विविध अनुदान योजनांनाही सहायभूत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेस कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या योजनेस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनीही गती दिली आहे. बँक निहाय खाती अशी(एकूण खाती, पहिल्या कंसात ग्रामीण व दुसऱ्या कंसात शहरी संख्या )कोल्हापूर जिल्हा मध्यवर्र्ती सहकारी बँक ५७ हजार २०९, (५३ हजार ६०५) ( ३ हजार ६०४), बँक आॅफ महाराष्ट्र ५३ हजार (३० हजार) (२३ हजार ), आय. सी. आय. सी. आय. बँक ४१ हजार ८६९ ( ३७ हजार ३६) (४ हजार ३३), स्टेट बँक आॅफ इंडिया २३ हजार २६८ (८४५९) (१४८०९), युनियन बँक आॅफ इंडिया १८ हजार ७६८ (१० हजार ११८) (८ हजार ६४७), आय. डी. बी. आय. बँक १६ हजार ५७९ (१२ हजार ९५६) (३ हजार २३), रत्नाकर बँक १० हजार ८५ (६ हजार ९५९) (३ हजार १२६), फेडरल बँक ९ हजार ८०९ (८ हजार ५३१) (१ हजार २७८), देना बँक ७ हजार ४९८ (६ हजार ३७) (१ हजार ४६१), कॉर्पोेरेशन बँक ७ हजार ४०८ (७ हजार १५०) (२५८), वेर्इंग कृष्णा ग्रामीण बँक ५ हजार ५७४ (५ हजार २७५) (२९९), बँक आॅफ बडोदा ४ हजार ४५० (३ हजार ७२२) (७२८), सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३ हजार ९४० (२ हजार ८३३) (१ हजार १०७), कॅनरा बँक २ हजार ७५६ (६३२) (२ हजार १२४), सिंडिकेट बँक २ हजार ३८३ (६७५) (१ हजार ७०८), अलाहाबाद बँक १ हजार २०० (१ हजार १७५) (२५), स्टेट बँक आॅफ हैदराबाद १ हजार ९८६ (४९२) (१ हजार ४९४), इंडियन बँक २ हजार ३०१ (३८) (२ हजार २६३), युको बँक १ हजार ९५१ (१ हजार ९१) (८६०), ओरिएंटल बॅँक १ हजार ७७२ (५२८ ) (१ हजार २४४ ), इंडियन ओव्हरसीज बँक १ हजार ५०० (१ हजार ५००) (निरंक), विजया बँक १ हजार ५३१ (निरंक) ( १ हजार ५३१ ), स्टेट बँक आॅफ पतियाळा ९५० ( निरंक ) (९५०), आंध्र बँक ६४४ (निरंक) (६४४), युनायटेड बँक आॅफ इंडिया ५९७ (३७) (५६०), एच. डी. एफ. सी. बँक ५७९ (११८) (४६१), सीटी युनियन बँक २८३ ( निरंक) (२८३), कर्नाटका बँक ११४ (निरंक (११४), पंजाब नॅशनल बँक ९६ (निरंक) (९६), करूर वैश्य बँक २६ (निरंक ) ( २६).