शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जनता दल (से) महाराष्ट्रात समविचारींसोबत; पुण्यातील बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 19:46 IST

देवेगौडांच्या भाजपा युतीला ठाम विरोध

राम मगदूम, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर: जनता दलाने (सेक्युलर) महाराष्ट्रात समविचारींबरोबरच माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपाबरोबर केलेल्या युतीलाही ठाम विरोध करण्याचा निर्धार प्रदेश जनता दलाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमुखाने केला आहे.  

राष्ट्र सेवा दलाच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार गंगाधर पटणे होते. बैठकीस राज्यातील २० जिल्ह्यातील ८० निमंत्रित सदस्य उपस्थित होते. प्रारंभी डॉ. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.राष्ट्रीय पातळीवर भाजपप्रणित आघाडीच्या विरोधी भूमिकेतून जनता दलाच्या विविध राज्य संघटनांनी सामूहिक विचार प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामध्येही सक्रीय सहभागी होण्याचा निर्णय यावेळी झाला.

राज्यातील अन्य समविचारी पक्षांपैकी योग्य पर्याय निश्चित करण्यासाठी समान विचारसरणी असलेले राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष व अन्य पयार्यासंदर्भात समक्ष चर्चेसाठी खास समिती नेमण्यात आली. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या संमतीने ही समिती संबंधित पक्ष नेतृत्वाशी चर्चा करेल. त्यानंतर त्यामध्ये सहभागी होण्याचा व पुढील वाटचाल करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

बैठकीस साजिदा निहाल अहमद, प्रताप होगाडे, शिवाजी परुळेकर, अ‍ॅड. रेवण भोसले, डॉ. विलास सुरकर, सलीम भाटी, अ‍ॅड. नंदेश अंबाडकर, विठ्ठल सातव, दत्तात्रय पाकिरे, विद्याधर ठाकूर, प्रभाकर नारकर, शानेहिंद निहाल अहमद, साधना शिंदे, कर्नल चंद्रशेखर रानडे, नाना मानकर, जितेंद्र सत्पाळकर, शरद पाडळकर, जीवन श्रीसुंदर, विनायक लांबे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते. विठ्ठल सातव यांनी स्वागत केले. डॉ. पी. डी. जोशी-पाटोदेकर यांनी सूत्रसंचलन केले. युयुत्सु आर्ते यांनी आभार मानले.देवेगौडांशी संबंध तोडले

देवेगौडांच्या युतीचे परिणाम सर्व राज्यांतील कार्यकर्ते व मतदारांवर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनाही राष्ट्रीय नेतृत्व व पक्षाशी संबंध तोडणे अपरिहार्य आहे. त्यामुळे अन्य समविचारी पक्षांसोबत राहण्याचा निर्णय बैठकीत झाला.   

टॅग्स :kolhapurकोल्हापूर