शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नूलमध्ये जनता दल-राष्ट्रवादी यावेळीही एकत्रच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 16:34 IST

gram panchayat, Elecation, Kolhapurnews नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता दल व राष्ट्रवादी यावेळीदेखील एकत्रच लढण्याची शक्यता आहे. त्यांच्याबद्दल नाराजी असणाऱ्या मंडळींच्या साथीने आव्हान देण्याच्या हालचाली भाजपाकडून सुरू आहेत.

ठळक मुद्देनूलमध्ये जनता दल-राष्ट्रवादी यावेळीही एकत्रच, श्रीपतराव शिंदेंचे गाव नाराजांच्या साथीने भाजपा आव्हान देण्याची शक्यता

राम मगदूम

 गडहिंग्लज- नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता दल व राष्ट्रवादी यावेळीदेखील एकत्रच लढण्याची शक्यता आहे. त्यांच्याबद्दल नाराजी असणाऱ्या मंडळींच्या साथीने आव्हान देण्याच्या हालचाली भाजपाकडून सुरू आहेत.माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या या गावात अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढलेले जनता दल-राष्ट्रवादी गेल्यावेळी पहिल्यांदाच एकत्र लढले. त्यांना भाजपा-शिवसेना युतीने आव्हान दिले. परंतु, आघाडीने एकतर्फी बाजी मारली. १५ पैकी ९ जागा जनता दलाला तर ६ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या.निवडणुकीपूर्वी सरपंचपद जनता दलाकडे तर उपसरपंचपद राष्ट्रवादीकडे असे सूत्र ठरले होते. त्यानुसार जदचे बाजीराव चव्हाण-पाटील व स्वाती प्रविण शिंदे यांना सरपंचपदी तर राष्ट्रवादीच्या कल्लाप्पाण्णा देसाई यांना उपसरपंचपदी संधी मिळाली.दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जनता दल व राष्ट्रवादीने राजेश पाटील यांना पाठबळ दिले. परंतु, विरोधी आघाडीतील भाजपाचे मल्हार शिंदे, कुमार देसाई व महादेव वडर, शिवसेनेचे डॉ. दिलीप मांजरेकर व डॉ. स्वप्निल चव्हाण, वंचितचे भीमा नंदनवाडे यांनी सोयीची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरच निवडणुकीचे चित्र व रंगत अवलंबून आहे.विरोधकांची मदार नाराजांवरजि. प. निवडणुकीतील पराभवामुळे राष्ट्रवादीचे जितेंद्र शिंदे नाराज आहेत. आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत नूलमध्ये झालेल्या स्वतंत्र बैठकीत त्यांनी जनता दलाबरोबर आघाडी नको असे मत मांडल्याचे समजते.जदचे प्रमुख कार्यकर्ते पापा चौगुले हेही अलिकडे पक्षापासून लांब आहेत. यांच्यावरच विरोधकांची मदार राहणार आहे.

जयसिंग, पी.एम., आले एकत्रशिवपार्वती दूध संस्थेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जयसिंग चव्हाण आणि पी. एम. चव्हाण, इकबाल काझी हे पुन्हा एकत्र आले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी हे तिघेही नेहमी पक्षाबरोबरच राहिले आहेत.

  •  एकूण मतदार - ६४००
  •  एकूण प्रभाग - ५
  • एकूण सदस्य - १५
टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर