शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या निषेधार्थ गडहिंग्लजमध्ये जनता दलाचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 19:15 IST

गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणा-यांची संख्या कमी झाली

राम मगदूम

गडहिंग्लज : देशातील सर्वसामान्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणा-यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढणा-या शक्तींची संख्या वाढवा, असे आवाहन जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी केले. महागाई, गॅस व वीज दरवाढीच्या निषेधार्थ जनता दलातर्फे गडहिंग्लज प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील म्हणाले, हे सरकार धोकेबाजांचे आहे. सत्तेत नसताना महागाईविरोधी आंदोलने करणा-या भाजपाला सत्ता मिळाल्यावर त्याचा विसर पडला आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून गॅस, वीज, इंधन सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे.माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, महागाईमध्ये भारताचा जगात १२ वा क्रमांक लागतो. देशातील गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत चालली आहे. सत्ताधाºयांना फक्त सत्तेशी पडले आहे. त्यामुळे देश अधोगतीकडे चालला आहे.शहरातील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरूवात झाली. प्रमुख मार्गावरून फिरून आल्यानंतर प्रांतकचेरीसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याठिकाणी प्राचार्य जे. बी. बार्देस्कर, शिवानंद घस्ती, शरद पाडळकर, काशिनाथ देवगोंडा, दत्तात्रय मगदूम यांची भाषणे झाली.मोर्चात तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, उदय कदम, मधुकर पाटील, महांतेश पाटील, बाळकृष्ण परीट, शशीकांत चोथे, हिंदूराव नौकुडकर, अजित शिंदे, मनोज कदम, भिमराव पाटील, महेश कोरी, नितीन देसाई, रमेश पाटील, मोहन भैसकर, सुनिता पाटील, नाज खलिफा, शकुंतला हातरोटे, शशीकला पाटील, आदींसह नागरिक सहभागी झाले होते.अॅड. शिंदे म्हणाले..!

  • शहराच्या विकास आराखड्यात कचरा डेपो आणि सांडपाणी प्रकल्पांसाठी हिरण्यकेशीच्या काठावरील जमिनींवर आरक्षणे टाकली आहेत. पावसाळा आणि पूरपरिस्थितीत तेथील सर्व घाण थेट नदीत मिसळणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प त्याठिकाणी होवू देणार नाही.
  • लोकशाहीमार्गाने निवडणुका होतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे हुकूमशाहीकडे चाललेल्या सत्ताधा-यांना भय वाटले पाहिजे असे जनशक्तीचे संघटन निर्माण करायला हवे. 
टॅग्स :kolhapurकोल्हापूरInflationमहागाई