शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७0 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात  : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:05 IST

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान ...

ठळक मुद्देकलम ३७0 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात  : माधव भंडारी​​​​​​​ भारतीय जनता पक्षाच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. त्यामुळेच भाजपने ३७० कलम रद्द करत खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरला राष्ट्रीय प्रवाहात आणल्याचे मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी दुपारी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर एकेकाळी काश्मीरमध्ये जाण्यासाठी व्हिसाप्रमाणे अन्य भारतीयांना परमिट घ्यावे लागत होते. याविरोधात जनसंघाने मोठे जनआंदोलन उभारले. संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्याबद्दल २१ दिवस तुरुंगवास झाला. त्यांच्या बलिदानाची परिपूर्ती हे कलम रद्द करून भाजपने केली आहे.

हे कलम रद्द झाल्याने आता केंद्र सरकारच्या रोजगार हमीपासून शिक्षण, रस्ते, आरोग्य सुविधांच्या विविध योजना थेट जम्मू-काश्मीरमध्ये अवलंबल्या जातील. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा, असाच हा निर्णय आहे.स्वागत जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले. जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर भाजप संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, नगरसेविका भाग्यश्री शेटके, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायणन, अ‍ॅड. संपत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक आर. डी. पाटील, बाबा इंदूलकर, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, रवींद्र मुतगी, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरkolhapurकोल्हापूर