शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील लाठीचार्जचा निषेध: कोल्हापुरात कडकडीत बंद, फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी 

By भारत चव्हाण | Updated: September 5, 2023 11:21 IST

कोल्हापूर : जालना येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर बेछुट लाठीमार केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी ...

कोल्हापूर : जालना येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर बेछुट लाठीमार केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या ‘कोल्हापूर शहर’ बंदला आज, मंगळवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान शहरातील सर्व व्यवहार बंद ठेऊन व्यापारी, व्यावसायिकांनी पाठींबा दिला. कोल्हापूर बंदची हाक काल, सोमवारी देण्यात आली होती. बंदमध्ये मराठा समाजातील विविध संघटनांसह भाजप वगळता अन्य सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक  कार्यकर्त्यांचाही सहभाग आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून सर्व कार्यकर्ते ऐतिहासिक दसरा चौकात जमायला सुरवात झाली. कार्यकर्त्यांनी  शहरभर फिरुन बंदचे आवाहन करत फिरण्याची तयारी केली होती. परंतु बंदला कसलेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना दसरा चौकातच थांबण्याचा आग्रह धरला. कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद पाळून जालना येथील घटनेचा निषेध नोंदविला. या बंदमध्ये व्यापारी, व्यावसायिक, फेरीवाले, टपरीचालक, छोटे विक्रेते,  रिक्षा व्यावसायिकही सहभागी झाले. महापालिकेच्या शाळांना बंदच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली तर खासगी शाळातील कामकाजही बंद राहिले. रिक्षा वाहतुक बंद राहिल्याने वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. कोल्हापुरातून निघणाऱ्या एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. केएमटी ही शहर बस वाहतुकही सकाळनंतर बंद ठेवण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmaratha mahasanghमराठा महासंघDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस