शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Jain Monk Tarun Sagar : कोल्हापुरात तरुणसागर महाराजांचे यथोचित स्मारक व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:28 IST

क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त जैन बांधवांतर्फे व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापुरात तरुणसागर महाराजांचे यथोचित स्मारक व्हावेसमस्त जैन बांधवांतर्फे ‘विनयांजली’प्रसंगी मागणी

कोल्हापूर : क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त जैन बांधवांतर्फे व्यक्त करण्यात आली.शुक्रवार पेठेतील जैन मठात राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांना ‘विनयांजली’ अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत उपस्थितांमधून असा सूर उमटला. सभेसाठी डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी विशेष उपस्थित होते.भारतीय जैन संघाचे पारस ओसवाल म्हणाले, महाराजांनी श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथांच्या लोकांना एकत्र आणले. राष्ट्रीय जैन मायनॉरिटीजचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराजांनी केवळ जैन धर्मियांनाच नव्हे, तर बहुजन समाजालाही प्रेरणा देणारे कार्य केले आहे.|पद्मिनी कापसे म्हणाल्या, आपल्या संपूर्ण प्रवचनात महिलांचा सन्मान होईल, अशी शिकवण महाराजांनी दिली. आई-वडील हे ईश्वरासमान आहेत. घरातून बाहेर पडताना त्यांना नतमस्तक झाले पाहिजे, असे सांगणारे ते एकमात्र तरुणसागर महाराज होते.पद्माकर कापसे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असणाऱ्या भगवान महावीर अध्यासन केंद्रांतर्गत मुनीश्री तरुणसागर महाराजांचे चिरंतन स्मारक व्हावे. त्यामध्ये महाराजांच्या संपूर्ण शिकवणीचा अभ्यास, ग्रंथालय, शिष्यवृत्ती, आदींचा समावेश असावा, अशी भावना व्यक्त केली. त्यास सर्व उपस्थितांनी हात वर करून संमती दिली.यावेळी मेजर एन. एन. पाटील, अ‍ॅड. महावीर बिंदगे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, आदींनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुधीर अलगौडर, सुनील पाटील, संजय आडके, अशोक रोटे, अमृत वणकुद्रे, सुशांत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

णमोकार महामंत्रातून विनयांजलीराष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराजांनी जैन समाजातील मरगळ दूर केली. नव्या क्रांतीची जागृती केली. त्यातून जैनधर्मीयच नव्हे तर सर्व धर्मियांमध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केले. त्यांचे विचार समाजाने पुढे नेले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. लक्ष्मीसेन महास्वामींनी आपल्या आशीर्वचनात केले. यावेळी उपस्थितांनी स्वर्गस्थ महाराजांना णमोकार महामंत्रातून विनयांजली अर्पण केली. 

 

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरkolhapurकोल्हापूर