शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जाधव इंडस्ट्रीजची आगेकूच कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल ; आर. आर. चॅलेंजर्स - महाराष्ट्र क्वीन लढत बरोबरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:33 IST

कोल्हापूर : लाको भूतियाच्या उत्कृष्ट खेळी व निशाच्या एकमेवगोलच्या जोरावर जाधव इंडस्ट्रीजने मल्टी वॉरियर्सचा निसटता पराभव करीत कोल्हापूर वुमेन्स लीगफुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली; तर

कोल्हापूर : लाको भूतियाच्या उत्कृष्ट खेळी व निशाच्या एकमेवगोलच्या जोरावर जाधव इंडस्ट्रीजने मल्टी वॉरियर्सचा निसटता पराभव करीत कोल्हापूर वुमेन्स लीगफुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली; तर आर. आर. चॅलेंजर्स विरुद्धमहाराष्ट्र क्वीन यांच्यातीलतुल्यबळ लढत बरोबरीतसुटली.

शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आर. आर. चॅलेंजर्स विरुद्ध महाराष्ट्र क्वीन यांच्यातील तुल्यबळ लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. सामन्यात आर. आर. चॅलेंजर्सकडून प्रतीक्षा मिठारी, अनुष्का खतकर, सोनाली साळवी, पूजा करमरकर; तर महाराष्ट्र क्वीनकडून मिशेल कॅस्टन, सोनिया राणा, सुचिता पाटील, प्रणाली चव्हाण यांनी अनेक खोलवर चढाया केल्या.

मात्र, दोन्ही बाजूंच्या बचावफळ्या भक्कम असल्याने संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. परिणामी संपूर्ण वेळेत सामना गोलशून्य असा बरोबरीत राहिला. सामन्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनुष्का खतकर (आर. आर. चॅलेंजर्स), मिशेल कॅस्टन (महाराष्ट्र क्वीन) या दोघींचा गौरव करण्यात आला.

दुसरा सामन्यात जाधव इंडस्ट्रीजने मल्टी वॉरियर्सचा १-० असा निसटता पराभव केला. यात ‘मल्टी’कडून पृथ्वी गायकवाड, सरस्वती माळी, रम्या शांतिप्रसाद, तेजस्विनी कोळसे, पूजा धमाल यांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या; तर जाधव इंडस्ट्रीजकडून निशा, जुलेखा बिजली, लाकोभूतिया, रिया बोलके, भक्ती पोवार यांच्यात समन्वय नसल्याने या खेळाडूंच्या अनेक गोलकरण्याच्या संधी वाया गेल्या. पूर्वार्धातही अनेक संधी निशा हिला मिळाल्या. मात्र, तिला आलेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.

उत्तरार्धात दोन्ही संघांनी एकमेकांवर आघाडी घेण्यासाठी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. यात जाधव इंडस्ट्रीजकडून निशा हिने, तर मल्टी वॉरियर्सकडून रम्या शांतिप्रसाद हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ५३ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीवर निशाने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. याच आघाडीवर जाधव इंडस्ट्रीजने विजय मिळविला. या सामन्यात लाको भूतिया (जाधव इंडस्ट्रीज) हिचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला.गुणसंख्या अशी,आर. आर. चॅलेंजर्स- ५, महाराष्ट्र क्वीन व जाधव इंडस्ट्रीज प्रत्येकी ४, छत्रपती शिवकन्या- २, तर मल्टी वॉरियर्स- ० गुण.कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी आर. आर. चॅलेंजर्स विरुद्ध महाराष्ट्र क्वीन यांच्यातील तुल्यबळ लढतीमधील एक संघर्षपूर्ण क्षण.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर