जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या ९७ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:12+5:302021-01-23T04:26:12+5:30

इन्फोसिस, काँग्निझेंट, फायझर्व, ग्लोबल एज, आटोस सिनटल, जयश्री टेक्नॉलॉजी यांसह विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड ...

J. J. Selection of 97 students of Magdoom Engineering | जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या ९७ विद्यार्थ्यांची निवड

जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या ९७ विद्यार्थ्यांची निवड

Next

इन्फोसिस, काँग्निझेंट, फायझर्व, ग्लोबल एज, आटोस सिनटल, जयश्री टेक्नॉलॉजी यांसह विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. डॉ. मगदूम म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याचे करिअर घडविण्यासाठी महाविद्यालयामार्फत नेहमीच प्रयत्न केले जातात. ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाकडून विविध कंपन्यांमध्ये निवड होण्यासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देण्यात येते. लॉकडाऊनमध्ये पुणे येथील विविध कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रेनिंग पूर्ण करून घेण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांची चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. सोनाली मगदूम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक मुदगल, प्र. प्राचार्य डॉ. शुभांगी पाटील यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

फोटो - २२०१२०२१-जेएवाय-०३-डॉ. विजय मगदूम

Web Title: J. J. Selection of 97 students of Magdoom Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.