शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयची बुधवारपासून प्रवेशाची पहिली फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 16:49 IST

शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली फेरी बुधवार (दि. ९)पासून सुरू होणार आहे. तंत्रनिकेतनसाठी (पॉलिटेक्निक) अर्ज करण्यास अजून चार दिवसांची मुदत आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीची निवड यादी गुरुवारी (दि. १०) प्रसिद्ध होणार आहे.

ठळक मुद्देआयटीआयची बुधवारपासून प्रवेशाची पहिली फेरी अकरावीची गुरुवारी निवड यादी : तंत्रनिकेतनसाठी उरले चार दिवस

कोल्हापूर : शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली फेरी बुधवार (दि. ९)पासून सुरू होणार आहे. तंत्रनिकेतनसाठी (पॉलिटेक्निक) अर्ज करण्यास अजून चार दिवसांची मुदत आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीची निवड यादी गुरुवारी (दि. १०) प्रसिद्ध होणार आहे.जिल्ह्यातील आयटीआयसाठी एकूण ५१,३०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची अंतिम गुणवत्ता यादी शनिवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार प्रवेशाच्या पहिल्या फेरीची सुरुवात बुधवारपासून होणार आहे. पॉलिटेक्निकसाठी अर्ज करण्याची मुदत गेल्या तीन दिवसांपूर्वी वाढली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत अर्ज करता येतील.

शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली आहे. ही यादी गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सुमारे चार हजार जणांनी दिली जेईईअभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या आयआयटी, एनआयटीसारख्या राष्ट्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या वतीने (नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीए) मंगळवार (दि. १) ते रविवार (दि. ६ सप्टेंबर) दरम्यान संयुक्त प्रवेश परीक्षा (जॉइंट एंटरन्स एक्झाम (जेईई मेन्स) घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूरiti collegeआयटीआय कॉलेज