शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हाचा वार्षिक आराखडा हजार कोटी करण्याचा प्रस्ताव देणार, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 8, 2024 17:32 IST

जिल्हा नियोजनची सभा एकतर्फीच, क्षीरसागर यांची समजूत काढली

कोल्हापूर : वित्त व नियोजन विभागाने २०२८ सालापर्यंत कोल्हापूरच्या वृद्धीदराच्या उद्देशात वाढ केली आहे. दरडोई उत्पन्न व जीडीपी जास्त असल्याने राज्यात सर्वात जास्त उद्दिष्ट्य जिल्ह्याला दिले आहे. ते पुर्ण करण्यासाठी राज्य नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाचा वार्षिक आराखडा हजार कोटींचा करण्याचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली. जिल्हा नियाेजन समितीच्या सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसच्या आमदारांनी बहिष्कार घातल्याने ही सभा एकतर्फीच झाली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला खासदार धनंजय महाडीक, आमदार प्रकाश आबीटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश पाटील, प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, सन २०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनवर नेण्याचा उद्देश असून जिल्ह्याची अर्थव्यवस्था ३ लाख कोटींवर न्यायची आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठीचे बजेट ठरविण्यासाठी १० तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी कोल्हापूरला निमंत्रित करण्यात आले आहे. त्यावेळी जिल्ह्यासाठी १ हजार कोटींची मागणी करण्यात येणार आहे. ती मान्य झाल्यास जिल्ह्याच्या विकास कामांना चालना मिळेल. अंबाबाई मंदिर विकास आराखडा सादर यावेळी ७०० कोटींचा अंबाबाई मंदिर विकास आराखडा सादर झाला. यात ४.५ हेक्टरमधील भुसंपादन व विकासाचा समावेश असून हा निधी मिळाला तर सध्या वर्षाला असलेली भाविकांची १ कोटींची संख्या १० कोटींवर जाऊ शकते असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. क्षीरसागर यांची समजूत काढली..१०० कोटींच्या रस्ते विकासाचे काम थांबले आहे यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, लवकरच रस्त्यांचे काम सुरू होईल. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांची मी केडीसीसीमध्ये बैठक घेऊन समजून काढली आहे. त्यामुळे आता आमचं ठरलं आहे तसंच होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPlanning Commissionनियोजन आयोगHasan Mushrifहसन मुश्रीफguardian ministerपालक मंत्री