शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

..'तरी आरटीपीसीआर सक्ती करुन नागरिकांना परत पाठवणे योग्य नाही, कर्नाटकची भूमिका आडमुठेपणाची'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 15:01 IST

नॅशनल हायवे बंद करणे चुकीचे आहे. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून विनंती करेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : नागरिकांना राज्यात प्रवेश देण्याबाबत कर्नाटक सरकारची भूमिका नेहमीच आडमुठेपणाची राहिली आहे.  देश-परदेशांमध्ये दोन डोस असेल तर प्रवेश दिला जात असताना आरटीपीसीआरची पण सक्ती करुन नागरिकांना परत पाठवणे योग्य नाही मी स्वत: याबाबत कर्नाटक सरकारला पत्र पाठवून विनंती करेन अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली.कर्नाटक सरकारकडून कोगनोळी टोल नाक्यावर नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असले तरी आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करून नागरिकांना परत पाठवले जाते याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्र शासनाने राज्यांमधील प्रवेशाबाबत काही निकष घालून दिलेले आहेत. दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवाल असा निकष आहे. दोन डोस झाले असतील देशात परदेशात कुठेही फिरता येते मग कर्नाटकात प्रवेश का दिला जात नाही.कर्नाटकमध्ये नागरिकांना रोज ये-जा करावे लागते, दैनंदिन व्यवहार करायचे असतात, गडहिंग्लज, चंदगडला जायचे असले तरी कोगनोळीवरून जावे लागते. असे असताना नॅशनल हायवे बंद करणे चुकीचे आहे. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून विनंती करेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलKarnatakकर्नाटकcorona virusकोरोना वायरस बातम्या