शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लिफ्ट मागितली, गाडीवर बसला, मागूनच वार केला; चिपरीतील तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:29 IST

सहा तासांत आरोपींना अटक

जयसिंगपूर : जुन्या वादाचा राग मनात धरूनच चिपरी (ता. शिरोळ) येथील संदेश लक्ष्मण शेळके (वय २२) या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तिघा आरोपींना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. युवराज रावसाहेब माळी (३०, रा. फिल्टर हाउसजवळ चिपरी), सूरज बाबासो ढाले (३०, रा. खोची, ता. हातकणंगले) व गणेश संभाजी माळी (२५, रा. माळभाग चिपरी) या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.मोपेडवरून लिफ्ट मागून आलेल्या युवराजनेच संदेशचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत संदेश याच्या बहिणीने युवराजच्या आईबद्दल अपशब्द वापरला होता. याचा राग मनात धरूनच हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.संदेश हा मोपेडवरून चिपरी येथे जात असताना त्याच्यावर अज्ञातांनी धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली होती. खुनाची घटना वाऱ्यासारखी चिपरीसह परिसरात पसरली होती. नेमका खून कोणत्या कारणातून झाला. याबाबत तर्कवितर्क सुरू होते. गावाजवळच खुनाची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पाहणी केली असता संदेश याच्या मोपेडवरून पावसाळी जर्किन घातलेला व्यक्ती बसून आल्याचे दिसून आले होते. त्याच्या वर्णनावरून पोलिसांनी माहिती मिळवली. आरोपी कर्नाटकातील चिक्कोडी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून तिघा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली.सहा तासांत आरोपींना अटकखुनाच्या घटनेनंतर आरोपी युवराज हा सूरज व गणेश यांच्या मदतीने कर्नाटकात पळून गेला होता. चिक्कोडी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अवघ्या सहा तासांत आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोध लावला. लिफ्ट दिली अन् घात झालाबहिणीला चिपरी फाटा येथे सोडून संदेश गावाकडे येत असताना लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने युवराज हा त्याच्या मोपेडवर बसला. घोडावत ऑइल मिलजवळील राजू सूर्यवंशी यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर आल्यानंतर संदेशच्या मानेवर आरोपीने धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केला. त्यानंतर सूरज व गणेश यांच्या मदतीने युवराज हा कर्नाटकात पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.