शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘ती माझी सही नाही; माझा टक्केवारीत सहभाग नाही’; ड्रेनेजलाइन कामातील घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांचे खुलासे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:22 IST

यासंबंधीची सर्व कागदपत्रे एकत्र करण्यात आली

कोल्हापूर : ड्रेनेजलाइनचे काम न करताच ७२ लाख उचलल्याप्रकरणात ‘आपला सहभाग नाही, माझी सहीच नाही, माझ्या लॉगीनचा कोणीतरी गैरवापर केला’, असे सांगण्याचा खटाटोप आता महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या प्रकरणात संशयाच्या जाळ्यात सापडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी आपले खुलासे प्रशासनाकडे सादर केले. त्यात प्रत्येकाने ‘मी त्यात नाही, माझी चूक नाही’, असे नमूद केले आहे.गेल्या काही दिवसांपासून कसबा बावडा येथील ड्रेनेजचे काम न करताच ७२ लाखांचे बिल उचलून महापालिकेची फसवणूक केल्याचे प्रकरण चर्चेत आहे. पालिकेच्या इतिहासात असे प्रथमच घडल्याने प्रशासनही हादरून गेले आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात सर्वांना नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासे मागविले आहेत.अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी बजावलेल्या नोटीसनुसार तत्कालिन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, वरिष्ठ लेखापरीक्षक वर्षा परिट, उपशहर अभियंता रमेश कांबळे, लेखाधिकारी संजय सरनाईक, पवडी अकौंट्स विभागातील उपअधीक्षक बळवंत सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी त्यांचे खुलासे सोमवारी रचना व कार्य पद्धती विभागाकडे जमा केले. यासंबंधीची सर्व कागदपत्रे एकत्र करण्यात आली आहेत.चौकशीचा भाग असल्याचे कारण देत त्यांचे खुलासे गोपनीय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. तथापि या प्रकरणात आपला काहीच दोष नाही, माझा या प्रकरणाशी काही संबंधही नाही, कागदपत्रावर झालेल्या सह्या आपल्या नाहीत, ऑनलाइन लॉगीनचा कोणी तरी गैरवापर केला असावा, असे सांगण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. प्रकरण अंगलट आल्यामुळे एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचाही प्रयत्न काहींनी केला आहे.या प्रकरणाचा तपास अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर करत आहेत. महापालिकेतील सध्याच्या कामाचा व्याप, बैठका, भागातील फिरती ही सगळी उठाठेव करून चौकशीचे काम किती जलदगतीने करणार हे आठ दिवसात कळणार आहे. कारण चौकशी अहवाल आठ दिवसात देण्याचे आदेश प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी समितीला दिले आहेत.