शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा धंदा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:38 IST

मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांमध्ये राज्याची तिजोरी सफाईदारपणे सफाई करण्याची स्पर्धा

कोल्हापूर : कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा नवीन धंदा राज्यात सुरू झाला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर शुक्रवारी हल्लाबोल केला.मागच्या महिन्या दोन महिन्यात जे अध्यादेश काढले गेले त्यांची संख्या जवळपास ३५० इतकी आहे आणि त्याची अंमलबजावणी करायची म्हटले तर एक लाख ४४ हजार कोटी रुपये लागणार आहेत. मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांमध्ये राज्याची तिजोरी सफाईदारपणे सफाई करण्याची स्पर्धा लागली आहे. जे मिळेल ते लुटा असं सगळं राज्य चालले असल्याची टीका त्यांनी केली.जे जे अध्यादेश काढले, त्यामुळे लोक दुखावले जात आहेत. धनगरांसाठी अध्यादेश काढला, त्यामुळे ओबीसी दुखावला गेला. तो मंत्रालयात उड्या मारतो आहे. त्यांनी भेटायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. केवढे दुर्दैव आहे. उपेक्षित आमदारांना तीन दिवसापासून वेळ मिळत नसेल तर राज्यकर्ते कोणत्या लायकीचे आहेत हे स्पष्ट झाले, असे वडेट्टीवार म्हणाले.

..त्यावेळी दिवा जास्त फडफडतोदिवा विझायला लागतो त्यावेळी जास्त फडफडतो. महायुतीचा दिवा विझणारच आहे. त्यातील तेल संपले आहे. सरकारचे तेल आता संपले आहे. कालच तीस हजार कोटींचे ओव्हरड्राफ्ट सरकारने काढले. म्हणजे कर्ज काढून लग्न करा आणि घराला बरबाद करा, असा सरकारचा फंडा दिसतोय, असेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारGovernmentसरकार