शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

एकरकमी ‘एफआरपी’ देणेही अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:34 IST

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने ३२१७ रुपये पहिली उचल मागून ऊसदराचे रणशिंग फुंकले आहे; पण सध्याचा बाजारातील साखरेचा दर, ...

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने ३२१७ रुपये पहिली उचल मागून ऊसदराचे रणशिंग फुंकले आहे; पण सध्याचा बाजारातील साखरेचा दर, बॅँकांकडून मिळणारी उचल पाहता एकरकमी ‘एफआरपी’ देणेही अवघड असल्याचे साखर कारखानदारांमध्ये मत आहे. एकूणच परिस्थिती पाहता एकरकमी एफआरपीवर तडजोड होण्याची दाट शक्यता आहे.रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटन ३५०० रुपये, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ‘रयत’ संघटनेने एफआरपी अधिक २00 रुपये, तर खासदार राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’ संघटनेने एकरकमी ३२१७ रुपये (म्हणजे एफआरपी अधिक दोनशे) मागणी करून ऊसदर आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. केंद्र सरकारने यंदा एफआरपीचा बेस ९.५ वरून १० टक्के करून एफआरपीत २०० रुपयांची वाढ केली आहे; त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची सरासरी एफआरपी २७५० रुपये होते. तिन्ही संघटनांनी वेगवेगळी मागणी केली असली तरी सध्याचा साखरेचा दर २९०० रुपये प्रतिक्ंिवटल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखरेचा किमान दर ३१ रुपये करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याला वेळ लागणार आहे. गेल्या हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात साखरेचा दर ३५०० रुपये होता, त्यावेळी यावर्षीपेक्षा एफआरपी कमी असूनही ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपयांवर तडजोड झाली आणि कारखान्यांची धुराडी पेटली; पण त्यानंतर साखरेचे दर घसरू लागले आणि उर्वरित २00 सोडाच, पण दोन तुकड्यांत एफआरपी द्यावी लागली.यंदा साखरेचे दर २९०० ते ३००० रुपयांच्या दरम्यान असल्याने बॅँकांचे मूल्यांकन त्या पटीतच होणार आहे; त्यामुळे बॅँकांकडून (८५ टक्के) २५६५ रुपये मिळू शकतात. त्यातून ५०० रुपये मागील कर्जाचा हप्ता व २५० रुपये प्रक्रिया खर्च वजा जाता १८६५ रुपये निव्वळ उसासाठी शिल्लक राहतात. बगॅससह इतर उपपदार्थांच्या विक्रीतून ३00 ते ४00 रुपये जरी उपलब्ध झाले तरी एफआरपी देण्यासाठी ५00 ते ६00 रुपये कमी पडतात, असे गणित साखर कारखानदारांचे आहे. शेतकरी संघटनांनी आपापल्या मागण्या रेटल्या असल्या तरी साखर दर, मूल्यांकन आणि उचलीचा ठोकताळा मांडूनच कारखानदार व संघटनांमध्ये तडजोड होऊ शकते. एकरकमी एफआरपीवर तडजोड होऊन आंदोलन शांत होऊन कारखान्यांची धुराडी पेटतील. पहिल्या १५ दिवसांचे बिल त्याप्रमाणे दिलेही जाईल; पण तेथून पुढे गत वर्षीप्रमाणे तुकडे करूनच पैसे देण्याची शक्यता नाकारता येत नाही.