शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सांडपाण्याच्या निर्गतीचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: February 25, 2015 00:07 IST

शाहू मराठी शाळा प्रभाग : विकासकामांना गती; काही ठिकाणी निधीअभावी रस्ते, गटारींची कामे अपूर्ण

कसबा बावडा : ठोंबरे मळा, जाधव मळा, यशवंत कॉलनी, कृष्णानंद कॉलनी, आनंद स्वरूप पार्क, आदी परिसरांसह १९ लहान-मोठ्या नवीन विकसित झालेल्या कॉलन्यांसह शेतीचा मोठा भाग असलेल्या ‘राजर्षी शाहू मराठी शाळा’ प्रभाग क्र. २ मधील रस्ते, पाणीपुरवठा, रस्त्यांवरील दिवे यांची बऱ्यापैकी स्थिती असली तरी प्रभागाच्या पूर्वेकडील असणाऱ्या ठोंबरे मळा, जाधव मळा, माळी मळा, आनंद स्वरूप पार्क, आदी कॉलन्यांतील सांडपाण्याच्या निर्गतीचा प्रश्न मात्र गंभीर आहे. सांडपाण्याची निर्गत होत नसल्याने ठोंबरे मळ्यापासून ते माळी मळ्यापर्यंत रस्त्यावर उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात कायम दलदल असते.प्रभागात नगरसेविकांचा संपर्क चांगला असला तरी प्रभागाचा विस्तार प्रचंड मोठा असल्याने तसेच शेतवाडीत दिवसेंदिवस प्लॉट पाडून कॉलन्या विकसित होत असल्याने निधीअभावी काही कॉलनीत रस्ते, गटारींची कामे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही विकासकामे प्रभागात मोठ्या प्रमाणात झाली आहेत. प्रभागात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत नसल्याचे दिसून येते.श्रीराम सोसायटीपासून यशवंत कॉलनी, गणेश कॉलनी, न्यू यशवंत कॉलनी, अजिंक्यतारा कॉलनी, रत्नदीप कॉलनी, पंचरत्न कॉलनी, महालक्ष्मी पार्क, तसेच मूळ गावठाणातील चव्हाण गल्ली, धनगर गल्ली, कवडे गल्ली, रणदिवे गल्लीपासून ते बावडा कदमवाडी रोडवरील देवार्डे मळ्यापर्यंत अशा भौगोलिक रचनेत हा प्रभाग विखुरला आहे. प्रभागाचा निम्म्याहून अधिक भाग शेतवाडीत प्लॉट पाडून विकसित झाला आहे. यामुळे या मतदार संघातील नागरिकांची संख्या वाढली आहे. मूळ गावठाणातील राहणारे तसेच बाहेरून आलेले व येथे प्लॉट घेऊन, बांधकाम करून स्थायिक झालेल्या उच्च मध्यमवर्ग, मध्यमवर्ग, कष्टकरी तसेच शेतकरी लोकांचा या प्रभागात समावेश आहे. जयंती नाला येथून पाईपलाईनने आणलेले सांडपाणी लाईन बाझार ड्रेनेज प्लॅँट येथे सोडले आहे. तेथून ते पाईपने प्रिन्स शिवाजी विद्यालयाच्या समोरील विहिरीत सोडले आहे. तेथून ते काही शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले आहे; परंतु या पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने तसेच पूर्वेकडील कॉलन्यांमधील सांडपाणी निर्गत न झाल्याने हे संपूर्ण पाणी शेतवाडी आणि माळी मळा रस्त्यावर पसरते. याबाबतच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक करत आहेत; परंतु त्यावर अद्याप उपाययोजना झालेली नाही. या प्रभागात रस्ते, पाणी, रस्त्यांवरील दिवे यांची सोय चांगली आहे. मात्र, गटारी साफ करण्यासाठी तसेच रस्ते साफ करण्यासाठी सफाई कामगार येत नसल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. नवीन विकसित झालेल्या कॉलनीत रस्ते, गटारींची कामे करण्यात नगरसेविका वंदना बुचडे यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी रस्ते न झाल्याने नागरिकांची नाराजी आहे. प्रभागात जास्तीतजास्त विकासकामे करण्यावर त्यांनी भर दिला आहे.प्रभागात आतापर्यंत पावणेचार कोटींची विकासकामे केली आहेत. त्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व महानगरपालिका यांच्याकडून निधी उपलब्ध झाला. यामध्ये प्रामुख्याने प्रभागातील रस्ते करण्यावर एक कोटी ४० लाख रुपये खर्च केले. तसेच गटर करण्यासाठी ८० लाख, पिण्याच्या पाण्याची पाईप टाकण्यासाठी ३० लाख, शाळा व भाजी मार्केट दुरुस्तीसाठी २२ लाख, चॅनेल बांधणीसाठी ६० लाख, पाणंद रस्ते दहा लाख, पॅव्हेलियन ग्राऊंड दुरुस्तीसाठी नऊ लाख व स्वच्छतागृहासाठी १२ लाख, असे तब्बल पावणेचार कोटी रुपये विकासकामांवर खर्च केले आहेत. प्रभागातील धनगर गल्लीतील नागरिकांनी रस्ता रुंदीकरणासाठी स्वत:हून आपली घरे पाडून पाच-पाच फूट जागा रस्त्यासाठी दिली. त्यामुळे अरुंद असणारी धनगर गल्ली रुंद झाली. आपल्या कारकिर्दीतील हे सर्वांत चांगले काम झाल्याचे नगरसेविका वंदना बुचडे यांना वाटते. - वंदना सुभाष बुचडे, नगरसेविका