शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: ‘सद्भावना रॅली’हे राजकीय षडयंत्र आहे का?, सकल हिंदू समाजाच्यावतीने सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:44 IST

एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे?

कोल्हापूर : एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे? हे नाटक फक्त हिंदूंवर अन्याय झाल्यानंतर हिंदू रस्त्यावर उतरल्यावरच कसे सुचते आणि ही रॅली म्हणजे राजकीय षडयंत्र आहे का? असा सवाल हिंदुत्ववादी पंचवीस संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे.कसबा बावडा येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीला पाळणा सजवणाऱ्या हिंदू महिलांना मारहाण झाली, हेर्ले येथे शिवजयंतीचे पोस्टर फाडले, बिहारमधील ६९ मुलांना आजऱ्याच्या मदरशात शिक्षण देण्यात येणार होते, ‘इंडिका’ गाडीवर ‘शरीयानुसार अजून ६ लग्नं बाकी आहेत’, असे लिहिलेली गाडी हिंदूंनी पकडून दिली.एका मौलवीच्या मुलाने एकटी आई, दोन मुली, एक वयस्कर आजी अशा परिवाराला हेरले. धमक्या दिल्या. राजकीय दबाव आणला आणि १६ वर्षांच्या हिंदू मुलीला फूस लावून तिचे धर्मांतर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी ‘औरंगजेब सगळ्यांचा बाप’ असे स्टेटस ठेवले. या सगळ्या घटना घडत असताना तथाकथित पुरोगामी कुठे होते? असा सवाल विचारण्यात आला आहे.जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतात, तेव्हा पुरोगामी गप्प का असतात? खरा हिंदुत्ववाद आतापर्यंत जपला म्हणूनच जिल्हा शांत असतो. परंतु, या रॅलीच्या निमित्ताने जर हिंदूंना दंगलखोर ठरवले जाणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. शांतता राहायची असेल तर या सद्भावना रॅलीला परवानगी देऊ नये, असेही नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर