शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवर आता लोह अन् आयोडिनयुक्त मीठ: नागपुरात विक्रीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 11:56 IST

रेशनवर ग्राहकांना आता लोह व आयोडिनयुक्त मीठ मिळणार आहे. याच्या विक्रीला बुधवारी नागपूरमधून सुरुवात झाली. कोल्हापुरात पुढील महिन्यापासून हे मीठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांना पुढील महिन्यापासून लाभ शक्य दुकानदाराला किलोमागे दीड रुपये कमिशन

कोल्हापूर : रेशनवर ग्राहकांना आता लोह व आयोडिनयुक्त मीठ मिळणार आहे. याच्या विक्रीला बुधवारी (दि. १८) नागपूरमधून सुरुवात झाली. कोल्हापुरात पुढील महिन्यापासून हे मीठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे.रेशनवर गहू, तांदळासोबतचा पाच वस्तू विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार असल्याचे सरकारकडून नुकतेच जाहीर करण्यात आले होेते. भाजीपाला, छोटे गॅस सिलिंडर, खते, बी-बियाणे, पोस्ट तिकिटांचा यामध्ये समावेश होता. याची प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी सुरुवातही करण्यात आली आहे. यापूर्वी तूरडाळ रेशनवर देण्यात आली आहे.आता मीठ ही रेशनवर देण्यास सरकारने परवानगी देऊन ते विक्रीसाठी ही उपलब्ध करून दिले आहे. नागपूरमध्ये बुधवारी (दि. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशन दुकानांतून मीठ विक्रीला सुरुवात करण्यात आली.

लोह व आयोडिनयुक्त मिठाच्या एक किलोच्या पॅकेटची विक्री होणार आहे. १४ रुपये प्रतिकिलो याची विक्री होणार असून त्यामध्ये दीड रुपया दुकानदाराला कमिशन मिळणार आहे. कार्डधारकांच्या संख्येनुसार प्रत्येक दुकानदाराला हे मीठ पुरविले जाणार आहे. खुल्या बाजारात एक किलो मिठाच्या पिशवीचा दर हा २० रुपये आहे. सर्वसामान्यांना माफक दरात मीठ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.रेशनवर साखर, पामतेल, काडेपेटी, साबण, खोबरेल तेल यासह १४ वस्तू विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी रेशनदुकानदारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने काही वस्तू विकण्यास परवानगी देऊन सकारात्मक पाऊल उचलल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी इतर वस्तूंच्या विक्री परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून रेशनवर विक्रीसाठी जादा वस्तू वाढविण्याची मागणी होती. त्यानुसार सरकारने यापूर्वी तूरडाळ विक्रीला परवानगी दिली आहे. आता मीठ विक्रीला ही परवानगी दिली आहे. या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनाला यश मिळत आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत असून अन्य वस्तूंच्या विक्रीसही लवकरच परवानगी द्यावी.-रवींद्र मोरे, शहराध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, कोल्हापूर 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर