शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

आयआरबीच्या रस्त्यांचे नव्याने होणार मोजमाप

By admin | Updated: February 26, 2015 00:53 IST

मुंबईत निर्णय : पुढील आठवड्यात उपसमितीची बैठक

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील प्रत्येक कामाचा दर्जा तपासून, इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनच्या मदतीने नव्याने मोजमापे घेण्याचा निर्णय संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखालील त्रयस्थ मूल्यांकन समितीच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती शहर अभियंता तथा समिती सदस्य नेत्रदीप सरनोबत यांनी दिली. पुढील आठवड्यात समितीची पुन्हा बैठक होणार आहे.संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प खर्च ठरविण्यासाठी नेमलेल्या त्रयस्थ तज्ज्ञ उपसमितीची पहिली बैठक मुंबईत झाली. दुपारी तीन ते साडेपाच वाजेपर्यंत चालेल्या या बैठकीत प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीत एमएसआरडीसी व महापालिका यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी व कामाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. प्रत्यक्ष कामाचा दर्जा तपासून अहवाल सादर करण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे मत तज्ज्ञांनी चर्चेअंती व्यक्त केले. प्रकल्पाचा नेमका खर्च कशा पद्धतीने ठरवावा, याबाबत प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून नव्याने मोजमाप घेण्याचे ठरले. येत्या पंधरा दिवसांत समिती सदस्य प्रकल्पाचा प्रत्यक्ष दौरा करणार आहे. जो प्रकल्प पूर्ण झाला आहे, त्याची प्रत्यक्षात किती उपयोगीता आहे हे तपासण्याची मागणी महापालिकेतर्फे सरनोबत यांनी केली. गटर्स झाल्या आहेत, मात्र पाणी जात नाही. विजेचे दिवे बसले मात्र, उजेड पडत नाही. रस्ते झाले तरी त्याखाली युटिलिटी पाईप्स अडकल्या आहेत. या सर्वांचा विचार करून जुन्या सर्वेक्षणाचा आधार न घेता नव्याने प्रकल्पाचा लेखाजोखाची मागणी सरनोबत व कोल्हापूर आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक वास्तुविशारद राजेंद्र सावंत यांनी केली. यानुसार आर्किटेक्ट असोसिएशनच्या मदतीने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष मोजमापास सुरुवात होणार आहे. बैठकीसाठी समिती सदस्य वास्तुविशारद श्री. रामचंदानी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ओहोळ व साहाय्यक कार्यकारी संचालक प्रकाश खेमचंदानी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रकल्पाचा नेमका खर्च पुढे येणे गरजेचे आहे. पूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा आधार न घेता नव्याने सर्वांसमक्ष सर्वेक्षण करण्याचे ठरले आहे. समितीची पुढील आठवड्यात पुन्हा बैठक होईल. त्यावेळी प्रकल्प भेटीची तारीख निश्चित केली जाईल. - नेत्रदीप सरनोबत, समिती सदस्य