शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

इराणी खणीत २१ फुटी ५ गणरायासह पावणे तीनशे गणेशमूतीँचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 14:52 IST

कोल्हापूर : उपनगरातील गणेशमूर्ती व २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावजवळील इराणी खण व त्या शेजारील खणीत मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत २७४ हून अधिक लहान मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जन पाहण्यासाठी अबालवृद्धांनी दोन्ही खणींभोवती मोठी गर्दी केली होती.इराणी खणीत मंगळवारी सकाळी ८ वाजता हनुमान तरुण मंडळ ...

ठळक मुद्देविसर्जन पाहण्यासाठी अबालवृद्धांनी दोन्ही खणींभोवती मोठी गर्दी गणेश विसर्जन येणाºया मंडळांना मानाचे श्रीफळ ढोल ताशा, स्टेरिओ ला अधिक पसंती

कोल्हापूर : उपनगरातील गणेशमूर्ती व २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावजवळील इराणी खण व त्या शेजारील खणीत मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत २७४ हून अधिक लहान मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जन पाहण्यासाठी अबालवृद्धांनी दोन्ही खणींभोवती मोठी गर्दी केली होती.

इराणी खणीत मंगळवारी सकाळी ८ वाजता हनुमान तरुण मंडळ (पाचगाव) येथील ७ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनाने सुरुवात झाली. त्यानंतर टेेंबेरोडवरील जादू गु्रप, आयोध्या कॉलनी मित्रमंडळ, बरसो रे बरसो मित्र मंडळ, पटेल मित्र मंडळ, कृष्णकृष्णाई मित्र मंडळ या मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जीत करण्यात आल्या.

दुपारी दोन वाजेपर्यंत ५९ मंडळांच्या गणेशांचे विसर्जन झाले होते. तर सायंकाळी साडेपाचपर्यंत १४६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. साडेसातनंतर मिरवणूकीला गती आली. रात्री साडेअकरा वाजता २ ३० इतक्या मंडळांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले. रात्री अकरानंतर विसर्जनाचा वेग मंदावला.

बुधवारी पहाटेपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत २७४ मंडळांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले. मंडळाच्या मिरवणूकीत महीलांचा सहभाग उत्स्फूर्त होता. यात महीलांनी भगवे फेटे बांधले होते. श्रमिक युवा मित्र मंडळ(विक्रमनगर) च्या गणरायाचा समावेश होता. दरम्यान गणेश विसर्जन येणाºया मंडळांना सतेज पाटील फौंडेशन व नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यातर्फे मानाचे श्रीफळ देण्यात आले.ढोल ताशा, स्टेरिओ ला अधिक पसंती

यंदा डॉल्बीला बंदी असल्याने गणेश विसर्जन मिरवणूकीत अनेक मंडळी ढोलताशा, दोन स्टेरीओ बॉक्स, कर्णे आदींना प्राधान्य दिले. या वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरत अनेकांनी नृत्याचा आनंद लुटला. 

गणेश मंडळांची संख्या लक्षात घेता महापालिकेने चार तराफे व दोन रबरी बोटींची सोय केली होती. तर मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी काही मंडळांनी मोठे क्रेनही भाड्याने आणले होते.

शिवाजी पेठ विभागीय कार्यालयातील १०० हून अधिक महापालिका कर्मचारी ३० तासाहून अधिक काळ दोन प्रहरीत कार्यरत होते. दोन्ही खणींच्या कडेने नागरीकांच्या सुरक्षितेकरीता महापालिकेने संरक्षक लोखंडी जाळ्या लावल्या होता. तर अग्निशमन दलाचे एक स्टेशन अधिकारी, एक तांडेल ८ कर्मचारी कार्यरत होते.२१ फु टी गणेशमूर्ती मंडळेप्रकाश बिल्डर मित्र मंडळ (शाहूपुरी), न्यू सम्राट चौक तरुण मंडळ, नरसिंह मित्र मंडळ , पुलगल्ली तालीम मंडळ, बजापराव माजगांवकर तालीम मंडळ, भगतसिंग तरुण मंडळ,१८ फुटी गणेश मंडळेएक दंताय तरुण मंडळ (जवाहर नगर), दिलबहार तालीम मंडळ, राजर्षी शाहू फ्रेंड सर्कल,१५ फुटी गणेश मंडळेविश्वशांती तरुण मंडळ (माळी गल्ली), नरसोबा तरुण मंडळ, न्यू चॅलेज मित्र मंडळ, विक्रम स्पोर्टस, स्वाभिमानी मित्र मंडळ, गणेश तरुण मंडळ, संतोष कॉलनी (सानेगुरुजी), जुना पंचमुखी गणेश तरुण मंडळ (शाहूपुरी), छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, डी.आण्णा मंडळ (विक्रमनगर), न्यू उद्यमनगर फ्रेंडस सर्कल यांचा समावेश होता.

‘खारीचा वाटा ’पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल, स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी यांना ‘ खारीचा वाटा ’ या संस्थेतर्फे पाच हजारांहून अधिक बिस्कीटांचे वाटप केले. या संस्थेचे अमेय गोखले, गौतम पलुसकर, चैतन्य पोटे, श्रेयस पाटील, सुधीर कुमार पाटील हे मिरवणूकीत साडेचार वाजल्यापासून रात्री दोन पर्यंत प्रत्येक कर्मचाºयाला भेटून बिस्कीट देत होते.

गेल्या सात वर्षांत इराणी खण येथे विसर्जित करण्यात आलेल्या ३ ते २१ फूट मूर्तींचा आकडा असा,वर्ष                          गणेश मंडळांची संख्या२०१०                         २६०२०११                         २६१२०१२                        २८५२०१३                        ३६६२०१४                       २५०२०१५                       ३५२२०१६                       २६२