शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचा प्रवास अपघाताला निमंत्रणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:52 IST

कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देजादाच्या पैशासाठी चालकही घेतात जोखीम पुरेशी झोप न मिळाल्यानेच अपघात

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.

कायम एकाच गाडीवर राहिले तर फार तर सहा-सात हजार पगार भेटतो, त्यापेक्षा रोज वेगळ्या गाडीवर काम केले तर त्यापेक्षा जादा पैसे व रात्रीचा वेगळा भत्ताही मिळत असल्याने त्याकडे कल वाढला असून, त्यातूनच चालक जोखीम घेऊन प्रवास करतात. सकाळी मुंबईहून आल्यानंतर रात्री पुन्हा मुंबईला जातात, झोप पुरेशी होत नसल्यानेच पहाटेच्या वेळी डुलकी येते आणि त्यातूनच अपघात होतो.जिल्हा बॅँकेचे कर्ज विभागाचे व्यवस्थापक रणवीर उदाजीराव चव्हाण यांचा मंगळवारी पहाटे पनवेलजवळ अपघातात मृत्यू झाला. चव्हाण हे घोरपडे साखर कारखान्याचे अधिकारी दीपक चव्हाण यांच्या गाडीतून गेले होते. चव्हाण यांनी बाहेरील चालक घेतला होता. मृत्यू कोणालाही रोखता येत नसला तरी काळजी घेणे आपल्या हातात असते. रात्री दहा वाजता कोल्हापुरातून ते निघाले आणि पहाटे अपघात झाला.

अपघातामध्ये चूक कोणाची हा विषय वेगळा असला तरी मुळात रात्रीचा प्रवास किती सुरक्षित हे पाहणे महत्त्वाचे आहे. रणवीर चव्हाण व दीपक चव्हाण हे दिवसभर आपापली कामे करून रात्री मुंबईकडे रवाना झाले. चालक घेतला तो दिवसभर झोपला होता का? त्याची कदाचित विचारपूस न करता ते निघाले.

रात्रीचे जेवण आणि महामार्गावर रात्रीची वाहने एकदम सुसाट असल्याने वेगाने निघाले. त्यात महामार्गावर किमान १० ते १५ किलोमीटर विनागेअर बदलता गाडी एकसारखी चालते. हे सर्वांत धोकादायक असून या कालावधीत डोळ्यावर झापड येते आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते होते.

वेळेची बचत अन्.....प्रत्येक क्षेत्रात धावपळ वाढल्याने प्रत्येकजण वेळेची बचत करण्याच्या मागे लागला आहे. मुंबईला काम असेल तर रात्रीचे निघायचे, सकाळी पोहचल्यानंतर दिवसभर काम करायचे आणि पुन्हा रात्री कोल्हापूरकडे निघायचे, असेच प्रयोजन असते. वेळेची बचत होते मात्र, आयुष्याचा वेग थांबतो.

लक्झरी, एस.टी.चा प्रवास सुरक्षितमुंबईला तातडीने जायचे असेल तर लक्झरी अथवा एस. टी. महामंडळाच्या वातानुकूलित बसेस असतात. त्यांच्याकडे दोन-दोन चालक असतात, ठरावीक अंतरानंतर ते बदलत असल्याने त्यातून प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर