शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

तपास मात्र कासवगतीने ..कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज तीन वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:58 IST

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज (मंगळवारी) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. अद्यापही त्यांचा तपास सुरूच आहे. ही तपास यंत्रणेची नामुष्की आहे.

ठळक मुद्देतपास यंत्रणांची नामुष्की : मुख्य आरोपी अद्याप फरार; गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रिव्हॉल्व्हरचा शोध घेण्यात उदासीनतादोघांच्या विरोधातील दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल

एकनाथ पाटील ।ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज (मंगळवारी) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. पुरोगामी विचारांच्या पानसरे यांच्या हत्येने राज्यभर एकच खळबळ उडाली. त्यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला. मात्र, या संवेदनशील हत्या प्रकरणाला तीन वर्षे पूर्ण झाली तरीही एसआयटीकडे ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. अद्यापही त्यांचा तपास सुरूच आहे. ही तपास यंत्रणेची नामुष्की आहे.कोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणास आज (मंगळवारी) तीन वर्षे पूर्ण होत आली तरी मुख्य आरोपी सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांच्यासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व रिव्हॉल्व्हरचा अद्यापही शोध लागलेला नाही.हत्येप्रकरणी समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे पोलीस रेकॉर्डवर आले. या दोघांच्या विरोधातील दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले आहे. या दोघांनाही या खटल्यात जामीन मिळाला आहे. पानसरे हत्येमध्ये तिसरे संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोळकर या दोघांचा समावेश असल्याचे दोषारोपपत्रानुसार न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. न्यायालयाने या दोघांची माहिती असलेले पत्रक शासकीय कार्यालय, शहरातील भित्तिपत्रकावर त्यांची माहिती लावावी. वर्तमानपत्रांतही (वाँटेड) त्यांची माहिती प्रसिद्ध करावी, याबाबतचे सर्व अधिकार तपास यंत्रणेला दिले आहेत; परंतु पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे या संशयितांना पकडण्याचे प्रयत्न झालेले दिसत नाही. भित्तिपत्रकांद्वारे ‘वाँटेड आरोपी’ म्हणून त्यांची फोटोंसह माहिती लावण्याचे औदार्यही दाखविले नाही. सन २००९ मडगाव बॉम्बस्फोटापासून हे दोघे संशयित फरार आहेत. ते ‘एसआयटी’ला सापडतील का? याबद्दल शंका आहे. नुकताच ‘एसआयटी’ने उच्च न्यायालयात पुरवणी तपास अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये पानसरे हत्या प्रकरणात आणखी काही संशयितांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने या फरार पवार व अकोलकर यांना सहकार्य करणाºयांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

‘एसआयटी’च्या वरिष्ठ अधिकाºयांकडे चौकशी केली असता, ते तपास सुरू असल्याचे सांगत आहेत. त्यांचा तपास सुरू असला तरी आरोपींचा शोध मात्र लागत नाही.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चारीही हत्या प्रकरणातील मारेकरी सापडत नाहीत, ही महाराष्टÑ-कर्नाटक पोलिसांची नामुष्की आहे. गेल्या तीन वर्षांत या पथकांच्या हाती कोणताच ठोस असा पुरावा लागलेला नाही. सध्या चार प्रमुख पथके स्थानिक स्तरावर, तर एक विशेष पथक नवी मुंबई येथे काम करीत असले तरी त्यांचा तपास कागदोपत्रीच सुरू असल्याचे समजते. सध्या या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे सोपविला आहे. दर महिन्याला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील तपासाचा आढावा घेतात.तिन्ही हत्यांचे सूत्रधारहिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याचा मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील, ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड, प्रवीण लिमकर, विनय पवार, सारंग अकोळकर यांच्याशी फोनवरून अनेकवेळा संवाद झाला आहे. या सहाजणांचे रॅकेट असून त्यांनी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी या तिन्ही हत्या कट रचून घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.दृष्टिक्षेपात पानसरे हत्या प्रकरण : १६ फेब्रुवारी २०१५ : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार२० फेब्रुवारी २०१५ : मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पानसरेंचा मृत्यू.२० फेब्रुवारी २०१५ : पानसरेंच्या हत्येप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल.२१ फेब्रुवारी २०१५ : पानसरे यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार.११ मार्च २०१५ : पानसरे यांच्यावर दोघांनी गोळ्या झाडल्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल२१ एप्रिल २०१५ : पानसरे हत्येचा तपास ‘एसआयटी’कडे२० मे २०१५ : पानसरे यांच्या स्मृतीचा जागर, ‘मॉर्निंग वॉक’चा प्रारंभ.६ जून २०१५ : संशयित मारेकºयांचे रेखाचित्रे व सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध३० आॅगस्ट २०१५ : धारवाड (कर्नाटक) येथे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या१६ सप्टेंबर २०१५ : पानसरेंचा संशयित मारेकरी समीर गायकवाड याला सांगलीतून अटक१४ डिसेंबर २०१५ : संशयित गायकवाडच्या विरोधात ३९२ पानांचे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल२० जून २०१६ : वीरेंद्र तावडे याला अटक१४ डिसेंबर २०१६ : वीरेंद्र तावडेविरोधात सत्र न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल२३ जून २०१७ : समीर गायकवाडला जामीन३० जानेवारी २०१८ : वीरेंद्र तावडेला पानसरे हत्येप्रकरणी जामीन.अडीच लाख कॉल तपासलेपानसरे हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक पद्धत अवलंबली. पानसरे यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील चार ते पाच मोबाईल कंपन्यांच्या टॉवरचे लोकेशन तपासले. हल्ल्यापूर्वी व नंतर कोणाकोणाचे कॉल्स आले-गेले याची माहिती घेतली. सुमारे अडीच लाख मोबाईल कॉल्सची अत्यंत बारकाईने व तांत्रिकदृष्ट्या माहिती मुंबईच्या तज्ज्ञ अधिकाºयांनी घेतली आहे.आतापर्यंतचे तपास अधिकारीतत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एस. चैतन्या, डॉ. दिनेश बारी, सुहेल शर्मा, तिरूपती काकडे (सध्याचे तपास अधिकारी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरे