शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

Kolhapur: बनावट नोटा ओडिशातून नव्हे, तर पश्चिम बंगालमधूनच आल्याचे स्पष्ट; दोघांना कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:06 IST

३५ लाखांच्या नोटा खपवल्या, आजअखेर १० आरोपी अटकेत

गडहिंग्लज : गडहिंग्लजमध्ये आलेल्या बनावट नोटा ओडिशामधून नव्हे तर पश्चिम बंगालमधून आल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी मलिक अफसरअली शेख (वय ३२) व टोनी जहरूद्दीन शेख (वय २३, दोघेही रा. परसुजापूर, पो. नयनसुख, ता. फराक्का, जि. मुरशिदाबाद, राज्य बंगाल) यांना गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची बुधवार (दि. ३०) पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकारांना तपासाची माहिती दिली. १७ जून २०२५ रोजी आकाश रिंगणे याने येथील एका बँकेच्या ‘सीडीएम’द्वारे आपल्या खात्यावर पाचशेच्या ३५ बनावट नोटा मिळून १७५०० रुपये भरले होते. संबंधित बँकेच्या फिर्यादीवरून हे प्रकरण उघडकीस आले.दरम्यान, चिक्कोडी येथील मुख्य आरोपी अशोक कुंभार, त्याचा मुलगा अक्षय यांनी नोटा ओडिशामधून तर ओडिशातील आरोपी तापसकुमार प्रधान याने आपण अशोककडूनच नोटा घेतल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोघांची एकत्र चौकशी केली असता, ‘त्या’ नोटा बंगालमधून येत असल्याचे उघडकीस आले. सपोनि. सागर पाटील, हवालदार रामदास किल्लेदार, कॉन्स्टेबल युवराज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपासासाठी पथक बंगळुरूला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

३५ लाखांच्या नोटा खपवल्या !१ ऑक्टोबर २०२४ ते १९ जून २०२५ या कालावधीत अशोकने बनावट नोटांच्या बदल्यात १६ लाख ८८ हजार रुपये मलिकचा मित्र टोनीच्या खात्यावर पाठवले आहेत. त्याने सुमारे ३५ लाखांच्या बनावट नोटा खपवल्याची चर्चा आहे. तो ओडिशाच्या तापसकुमारला सुतकट्टीच्या घाटात बोलावून बनावट नोटा देत होता. बनावट नोटांच्या बदल्यात त्याला लाखाला ६० हजारांचे कमिशन मिळाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

तपासासाठी ९६ तास, ५ राज्ये, ५५०० किलोमीटर प्रवासआरोपींच्या शोधासाठी सपोनि. सागर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गडहिंग्लजपासून कर्नाटक-तेलंगणा-आंध्र प्रदेश-ओडिशा ते पश्चिम बंगाल असा येता-जाता तब्बल ५५०० किलोमीटरचा ९६ तासांचा प्रवास कारने केला. मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण, त्यांच्या राहत्या घराची रेकी व चार दिवसांची टेहळणी करून बिश्नातनगर पोलिसांच्या सहकार्याने दोन्ही आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले.बंगळुरू जेलमध्ये ओळखबनावट नोटा प्रकरणात बंगळुरू जेलमध्ये शिक्षा भोगताना मुख्य आरोपी अशोकची जहरूद्दीन, दालीम व तापसकुमार यांच्याशी ओळख झाली. जेलमधून सुटल्यानंतर जहरूद्दीनशी संगनमत करून त्याचा मुलगा टोनीकडून अशोकने तब्बल २२ लाखांच्या बनावट नोटा घेतल्या. त्या नोटा दिलीप, सतीश, भरमू व अक्षय यांच्यामार्फत खपवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

  • जप्त मुद्देमाल : १५ लाखांची चारचाकी, २५ हजारांची दुचाकी
  • पाचशेच्या १०३ बनावट नोटा मिळून एकूण ५१५०० रुपये जप्त

आजअखेर अटकेतील आरोपी : १०

  • आकाश रवींद्र रिंगणे व नितीन भैरू कुंभार (रा. गडहिंग्लज),
  • अशोक महादेव कुंभार व अक्षय अशोक कुंभार (रा. चिक्कोडी)
  • दिलीप सिद्धाप्पा पाटील (बिद्रेवाडी, ता. हुक्केरी)
  • सतीश बसाप्पा कंकणवाडे (यादगुड, ता. हुक्केरी)
  • भरमू पुुंडलिक कुंभार (बसनाळगड्डे, ता. चिक्कोडी)
  • तापसकुमार प्रधान (ओडिशा)
  • मलिक अफसरअली शेख व टोनी जहरूद्दीन शेख (पश्चिम बंगाल)