शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तपास अहवाल उच्च न्यायालयात २९ ला सादर

By admin | Updated: September 15, 2016 00:57 IST

पानसरे हत्या प्रकरण : ‘एसआयटी’चा भक्कम तपास; समीरवर आरोप निश्चिती शक्य

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा पुरवणी तपास अहवाल ‘एसआयटी’ दि. २९ सप्टेंबरला उच्च न्यायालयात सादर करणार आहे. ‘एसआयटी’ने समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (४८, रा. पनवेल, जि. रायगड) यांना अटक केली आहे. तिसरा संशयित विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, जि. सातारा) हा फरार आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये या तिघा संशयितांच्या विरोधात भक्कम परिस्थितीजन्य पुरावे हाती लागले आहेत. हा अहवाल पाहून संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चितीचे आदेश उच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. पानसरे हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी गायकवाड हा सध्या कळंबा कारागृहात आहे. तावडे अकरा दिवस पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीमध्ये भक्कम पुरावे हाती आले आहेत. हे दोघेही मडगाव-गोवा येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यांतील फरार असलेले आरोपी रूद्रगौंडा पाटील, सारंग अकोळकर, प्रवीण लिमकर व जयप्रकाश हेगडे व विनय पवार यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तावडेची काळ्या रंगाची बॉक्सर मोटारसायकल बेपत्ता आहे. ती कोल्हापुरात घेतल्याचे निष्पन्न झाले तसेच गुन्ह्यात वापरलेली ट्रॅक्स वाशिम येथून जप्त केली. तावडेने पोलिसांना दिलेल्या माहितीची खातरजमा केली असता ती खोटी निघाली. त्यामुळे तो माहिती लपवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल येथील ‘सनातन’ आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांच्या साठ्याप्रकरणी ‘एसआयटी’ने गोवा आश्रमातील महिला डॉक्टर आशा ठक्कर हिला ताब्यात घेतले आहे. ती वीरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून आश्रमातील ‘खास’ साधकांना औषधे देत होती. साधिका सुदेशना पिंपळे हिच्याकडून तावडेच्या पत्नीलाही नकळत तीर्थ म्हणून औषधाचा डोस दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी समीर गायकवाडच्या मित्र, नातेवाइकांसह तावडेची पत्नी निधी तावडे, फरार पवारची पत्नी श्रद्धा पवार, साक्षीदार संजय साडविलकर, शैलेंद्र मोरे यांच्यासह बाराजणांचे इन कॅमेरा जबाब प्रथम वर्ग न्यायाधीशांसमोर घेतले आहेत. पानसरे हत्येदरम्यान समीर गायकवाड व विनय पवार संशयितरीत्या फिरताना लहान मुलासह दोघांनी पाहिले आहे. त्यामुळे विनय पवार हा तिसरा संशयित म्हणून रेकॉर्डवर आणला आहे. (प्रतिनिधी) या मुद्द्यावर सुरू आहे तपास संशयित तावडे याने पानसरे यांचे हत्येचा कटक रचण्यास केव्हा व कोठे सुरुवात केली. त्यामध्ये कोणत्या साथीदारांना समाविष्ट करून घेतले. साथीदारांना अग्निशस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण कुठे दिले, अग्निशस्त्रे व काडतुसे कुठून उपलब्ध केली. हत्येनंतर ती कुठे लपविली. गुन्हा करण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर करण्यात आला. प्रत्यक्ष गोळीबार कोणी केला, गुन्ह्याचा कट व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आर्थिक पुरवठा कोणी केला. आदी माहिती पोलिस तावडेकडून घेत आहेत.तावडेच्या कोठडीची उद्या, शुक्रवारी संपत आहे. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या तपासाची माहिती तपास अधिकारी सुहेल शर्मा सत्र न्यायालयात सादर करणार आहेत.