शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषणमधील अपहारात नेमका कोण?, कोल्हापूर जिल्हा परिषद चौकशी समितीही संभ्रमात

By समीर देशपांडे | Updated: November 1, 2024 13:46 IST

पाच व्हीडीओ, ऑडिओ असलेला पेन ड्राईव्ह

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार विभागातील २८ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी चौकशी पूर्ण झाली. परंतु यात नेमका दोष कोणाचा याबाबत चौकशी समिती संभ्रमात पडली आहे. त्यामुळे चार प्रकारे हा अपहार झाला असावा, असे याबाबतच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नेमका दोषी कोण आणि या रकमेची वसुली कशी होणार, असा सवाल उपस्थित होत असून, आता नेमकी जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी याबाबत सुनावणीला लेखाधिकारी दीपक माने यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली.

१७ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या या विभागाचे लेखाधिकारी दीपक माने यांचे काही जणांनी अपहरण करून त्यांना मारहाण केली. त्यांच्या फिर्यादीनंतर अपहाराचा प्रकार समोर आला. या अपहाराची जबाबदारी घेण्यासाठीच आपले अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी दिली होती. या प्रकरणी या विभागातील कंत्राटी कर्मचारी तेजस्विनी साठे यांच्या पतीसह काही जणांना अटकही झाली. दरम्यान, साठे यांना कार्यमुक्त करण्यात आले आणि माने यांचे निलंबन करून त्यांच्या मूळ आस्थापनेकडे पाठविण्यात आले.या प्रकरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने १२ ऑगस्ट २४ रोजी सुनावणी घेतली आणि त्याचा अहवाल ९ सप्टेंबर रोज दिला. त्याआधीच स्वयंपाक्यांच्या मानधनाची २८ लाख रुपयांची रक्कम परस्पर साठे यांनी आपल्या नातेवाइकांच्या खात्यावर वळवल्याचे स्पष्ट झाले. चौकशी समितीने सुनावणी घेतल्यानंतरचा अहवाल मोघम असून त्यामध्ये ठोस कोणावर जबाबदार निश्चित करण्यात आलेली नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा या सर्व प्रक्रियेशी संबंधित असून यातील माने यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचा मुद्दा चौकशी समितीने मांडला आहे.

पाच व्हीडीओ, ऑडिओ असलेला पेन ड्राईव्हतेजस्विनी साठे आणि त्यांच्या पतींनी अपहारित रकमेबाबत कबुली दिल्याच्या क्लिप पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये चार व्हिडीओ आहेत आणि एक ऑडिओ क्लिप आहे. परंतु यामध्ये पुरुष आणि पुरुष महिला असे संभाषण ऐकू येते. तथापि संभाषणानुसार ओठांची हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या व्यक्तींचे संभाषण आहे व ते कधी झालेले आहे हे समजून येत नाही. त्यामुळे संभाषण/आवाज तज्ज्ञांकडून खात्री करणे योग्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद