शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; जागा हस्तांतरणाचा तिढा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 12:46 IST

आयटी पार्कसारखा अनुभव नको

पोपट पवार कोल्हापूर : कोल्हापूरच्या क्रीडानगरीला साजेसे असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यासाठी विकासवाडी (ता. करवीर) येथील एमआयडीसीची १२ हेक्टर जागा देण्याचा चांगला निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला असला, तरी ही जागा अद्यापही महसूल विभागाकडेच असल्याने तिचे एमआयडीसीकडे हस्तांतर कधी करणार, असा सवाल कीडाप्रेमींमधून उपस्थित होत आहे.जोपर्यंत ही जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित होत नाही, तोपर्यंत स्टेडियम उभारणीत अडचणी आहेत. कोल्हापूर क्रिकेट असोसिशयनने ही जागेची अडचण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे. आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे एकदा आचारसंहिता जाहीर झाल्यावर विषय मागे पडू शकतो.कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी विकासवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यातील १२ हेक्टर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि.३) दिले होते. मात्र, ही जागाच अद्याप एमआयडीसीकडे नाही, तर ती क्रीडा विभागाला हस्तांतरित कशी करणार हा प्रश्न आहे. नेर्ली-विकासवाडी गावच्या हद्दीतील १११, ११२ व ११३ गट नंबरची १२ हेक्टर जागा सध्या महसूल विभागाच्या ताब्यात आहे.मात्र, या जागेसह येथील अन्य जागांवर मालकी हक्कात एमआयडीसीचे शिक्के पडले आहेत. जोपर्यंत महसूल विभाग एमआयडीसीकडे ही जागा वर्ग करत नाही, तोपर्यंत एमआयडीसीला ती क्रीडा विभागाला देता येणार नाही. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन (केसीए) या स्टेडियमचा आर्थिक भार उचलणार असून, जागा हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने झाली, तरच केसीएला जागेचा विचार लक्षात घेत स्टेडियमचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे महसूलने ही जागा तत्परतेने एमआयडीसीकडे वर्ग करणे गरजेचे बनले आहे.

आयटी पार्कसारखा अनुभव नकोकोल्हापुरात आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील कृषी विभागाची ३५ हेक्टर जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्याचा निर्णय होऊन वर्ष उलटले. मात्र, अद्यापही ही जागा एमआयडीसीकडे वर्ग झालेली नाही. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने आयटी पार्कचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. आता स्टेडियमच्या बाबतीतही ही दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. शाहू मिलमधील २७ एकर जागेचाही घोळ तसाच सुरू आहे. ही जागा वस्त्रोद्योग महामंडळाकडून अद्याप शासनाकडे हस्तांतरितच झालेली नाही. शासन ती कोल्हापूर महापालिकेकडे विकसनासाठी देणार होते. परंतु, मूळ प्रक्रियाच अजून झालेली नाही, कारण त्याचा रीतसर प्रस्तावच सादर झालेला नाही.

स्थानिकांचा होतोय विरोधनेर्ली विकासवाडी येथे राज्य सरकारने एमआयडीसी घोषित केली आहे. येथील जमिनीच्या मालकी हक्कात एमआयडीसीने शिक्के मारल्याने आधी ते शिक्के काढा, मगच स्टेडियम उभारा, अशी स्थानिकांची मागणी आहे. आमचा विराेध स्टेडियमला नसून, प्रस्तावित एमआयडीसीसाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

विकासवाडी येथील प्रस्तावित स्टेडियमसाठी दिलेली जागा महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाकडून जागा हस्तांतरित केल्याचे पत्र आम्हाला आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. - उमेश देशमुख, प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ, कोल्हापूर विभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर