शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

इच्छुकांच्या नजरा कागलकडे--बिद्री कारखाना निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:31 IST

कागल : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने कागल तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत मिळाल्याने शिवसेनेच्या नेत्यांनीही पर्यायी पॅनेलसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे

ठळक मुद्देराष्ट्रवादी-भाजप एकत्र, पर्यायी पॅनेलसाठी सेनेची मोर्चेबांधणीआता चर्चेत आणि पॅनेल रचनेत सहभागी व्हावे लागणार आहे.

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्क -कागल : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने कागल तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत मिळाल्याने शिवसेनेच्या नेत्यांनीही पर्यायी पॅनेलसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे संभाव्य दोन्ही पॅनेलमधील इच्छुकांच्या नजरा कागलकडे लागल्या आहेत.

कागल तालुक्यातील निम्मी गावे म्हणजे ४३ गावांचे कार्यक्षेत्र या साखर कारखान्यासाठी आहे. एकूण सभासदांच्या २५ टक्के म्हणजे ५८ हजारांपैकी जवळपास १५,००० सभासद या गावातील आहेत, तर न्यायालयीन प्रक्रियेत जे ४००० सभासद पात्र ठरले त्यामध्ये १६०० सभासद कागल तालुक्यातील आहेत. कारण येथील पॅनेलचे नेतृत्व कागल तालुक्यातील नेतेमंडळींच पुढाकार घेऊन करतात.

या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार हे तत्त्वत: जाहीर केले आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार मुश्रीफ यांच्यात चर्चेच्या फेºया झाल्या आहेत. आता तालुक्यातून रणजितसिंह पाटील हे प्रशासकीय मंडळावर आहेत, तर समरजितसिंह घाटगे भाजपचे नेतृत्व करीत आहेत. यामुळे यांना देखील आता चर्चेत आणि पॅनेल रचनेत सहभागी व्हावे लागणार आहे.

तर प्रा. संजय मंडलिकांनी भाजप-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान देण्यासाठी शिवसेनेची पॅनेल बांधणी सुरू केली आहे. संजयबाबा घाटगे यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. कारण तालुक्यात त्यांनी प्रा. मंडलिकांच्याबरोबरीने काही निवडणुका लढविल्या असल्या तरी अंबरीश घाटगेंना शिक्षण सभापतिपद देण्यात मंत्री चंद्रकांतदादांनीच पुढाकार घेतला होता.त्यामुळे या निवडणुकीसाठी आमदार हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे विरुद्ध प्रा. संजय मंडलिक- संजय घाटगे अशीच लढत होणार की यामध्ये काही बदल होणार? याकडे लक्ष वेधले आहे.