शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

पुरोगामी संघटनांची ‘सिनेट’साठी एकजूट

By admin | Updated: July 4, 2015 00:44 IST

पदाधिकारी बैठकीत निर्धार : निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देणार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अधिसभेची (सिनेट) निवडणूक आॅक्टोबरमध्ये होणार आहे. त्यासाठी १८ पुरोगामी पक्ष, संघटनांची एकजूट झाली आहे. संघटनांची पहिली बैठक गुरुवारी (दि. २) विद्यापीठात झाली.विद्यापीठातील ग्रंथालयासमोर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत प्रतिगामी संघटना वगळता अन्य सर्व पुरोगामी संघटनांच्या एकजुटीतून पुरोगामी ऐक्याची ताकद वाढविण्याचे निश्चित करण्यात आले. शिवाय प्रस्थापितांना या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखायला लावून धक्का देण्याचा निर्धारही केला. निवडणुकीच्या तयारीसाठी पक्ष, संघटनांशी मॅरेथॉन बैठका घेण्यासह चार दिवसांत पॅनेल, उमेदवार आणि जाहीरनामा घोषित करण्याचे ठरविले.बैठकीस प्रा. डॉ. मेघा पानसरे, रणजित चव्हाण, नीलेश चव्हाण, विकास जाधव, सुभाष देसाई, नंदकिशोर सुर्वे, शरद मिराशी, गौतम कांबळे, अनुप्रिया कदम, अमोल गाडे, जयवंत पोवार, राजेंद्र पोवार, अजित खिलारे, सुनीता अमृतसागर, सुशांत पाटील, अथर्व चव्हाण, अमोल महापुरे, सुनील गोटखिंडे, प्रशांत चांदणे, राजेश पवार, सना कच्छी, प्रियांका धनवडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संघटित झालेले पक्ष, संघटनासंभाजी ब्रिगेड, ब्लॅक पँथर, मराठा सेवा संघ, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन, भारतीय महिला फेडरेशन, विद्रोही विद्यार्थी संघटना, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मावळा ब्रिगेड, युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन, विश्व लिंगायत महासभा, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, डॉ. आंबेडकर यूथ असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, अखिल भारतीय नौजवान सभा, आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड.