शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘जयप्रभा'साठी निकराने लढू, चित्रपट महामंडळाच्या बैठकीत सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:50 IST

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ ही केवळ कोल्हापूरच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची वास्तू आहे. याबाबत न्यायालयाने निकाल दिला असला ...

ठळक मुद्दे‘जयप्रभा'साठी निकराने लढू, चित्रपट महामंडळाच्या बैठकीत सूचनालता मंगेशकर यांच्याशी संवाद साधून समन्वयाने प्रश्न सोडविता येईल

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ ही केवळ कोल्हापूरच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची वास्तू आहे. याबाबत न्यायालयाने निकाल दिला असला तरी येथे इमारती नव्हे, तर स्टुडिओचे जतन व्हावे. तेथे चित्रपट निर्मिती होणे गरजेचे आहे. यासाठी निकराने लढू , तसेच लता मंगेशकर यांच्याशी संवाद साधून समन्वयाने प्रश्न सोडविता येईल याचा विचार व्हावा, अशी सूचना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बैठकीत सभासदांनी मांडली.मागील आठवड्यात दिवाणी न्यायालयाने ‘जयप्रभा’वर लता मंगेशकर यांची खासगी मालकी असून, तेथे त्यांना बांधकामसह अन्य विकास करण्याची मुभा आहे, असा निकाल दिला होता. या निकालानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मिलिंद अष्टेकर म्हणाले, या प्रश्नात केवळ महामंडळ नव्हे तर शासनानेही लक्ष घालून स्टुडिओ ताब्यात घेतला पाहिजे. यासाठी जनरेटा तयार व्हावा म्हणून महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे. अर्जुन नलवडे म्हणाले, लता मंगेशकर यांनी स्टुडिओची जागा सोडावी, पण तेवढीच जागा त्यांना शासनाने अन्यत्र द्यावी, असे निवेदन आयुक्तांना द्यावे. बाबा पार्टे म्हणाले, न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यावर दोन्ही बाजूचे वकील, शहरातील प्रतिष्ठित मंडळी, महापालिका पदाधिकारी, महामंडळाचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊ. लतादीदींच्या मनामध्ये कोल्हापूरबद्दल अजूनही चांगलीच भावना आहे. त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करू. सर्वांना बरोबर घेऊन समन्वयानेच यावर तोडगा काढू. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीचीही मदत घता येईल. यावेळी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहखजानीस शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, श्रीकांत डिग्रजकर, सुरेंद्र पन्हाळकर, मंगेश मंगेशकर, राहुल राजशेखर, अरुण चोपदार, श्रीकृष्ण जोशी, रवींद्र बोरगावकर, सिद्धेश मंगेशकर उपस्थित होते.----------------------------------

 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरkolhapurकोल्हापूर