शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘अटल महापणन’ अभियानातून संस्था रोजगार निर्मितीची केंद्रे  : अनिरुद्ध अष्टपुत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:45 IST

अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून विकास सेवा संस्था सक्षम होण्याबरोबरच रोजगार निर्मितीचे केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी काढले.

ठळक मुद्दे ‘अटल महापणन’ अभियानातून संस्था रोजगार निर्मितीची केंद्रे  : अनिरुद्ध अष्टपुत्रेकोल्हापूर जिल्ह्यातील २३० संस्थांचा सहभाग

कोल्हापूर : अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून विकास सेवा संस्था सक्षम होण्याबरोबरच रोजगार निर्मितीचे केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी काढले.अटल महापणन विकास अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय लोकसंवाद मोहिमेचा प्रारंभ अष्टपुत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अष्टपुत्रे म्हणाले, ‘जिल्ह्यातील २२४ विकास संस्था व सहा खरेदी-विक्री संघ या अभियानात सहभागी झाले आहेत.

या संस्थांनी १४ कोटी ६९ लाखांची गुंतवणूक विविध व्यवसायांत केली आणि त्यामध्ये एक कोटी सहा लाखांचे उत्पन्न मिळाले. त्याचबरोबर १३५ जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यश आले आहे; त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी विकास संस्थांच्या माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.शिरोळचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी स्वागत केले. सहायक निबंधक टी. बी. बल्लाळ, संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील, चिखली विकास संस्थेचे सचिव विकास पाटील यांनी अभियानाबाबत माहिती दिली. सहायक निबंधक अमित गराडे यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील विकास संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.दृष्टिक्षेपात अभियानातील कोल्हापूरचा सहभाग-

  • विकास संस्था-२२४
  • खरेदी-विक्री संघ-६
  • गुंतवणूक-१४.६९ कोटी
  • उत्पन्न- १.०६ कोटी
  • निव्वळ नफा-५८ लाख
  • रोजगार उपलब्ध-१३५ व्यक्ती

 

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारkolhapurकोल्हापूर